आदित्य ठाकरेंनी दाखवली ३८ मतदारांची यादी, त्या खोलीत आता कुणीही राहात नाही

मुंबई:- विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर विरोधकांनी पराभवाची कारणे शोधताना अगोदर ईव्हीएम मशिनमध्ये घोळ असल्याचा आरोप केला. त्यानंतर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदार यादीत मोठा घोळ असल्याचे समोर आणले होते. आता, महाविकास आघाडीचे नेतेही मतदार यादीतील घोळ आणि बोगस मतदान समोर आणत आहेत. त्यातच, शिवसेना पक्षाच्या निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी प्रेझेंटेशन दाखवत वरळी मतदारसंघातील बोगस मतदार आणि मतदार याद्याबाबत गंभीर आरोप केले आहेत. वरळीतील एका खोलीत ३८ मतदार राहत असल्याचेही त्यांनी व्हिडीओतून दाखवलं होतं. आता, तेच किती खरं याची माहिती एबीपी माझाने घेतली आहे.

वरळीतील एका खोलीत खरंच ३८ मतदार राहतात का? आदित्य ठाकरे यांनीदाखवलेल्या व्हिडिओतील खोलीमध्ये नेमकं कोण राहतं, मतदार राहतात कां? याची माहिती आम्ही घेतली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी वरळीतील मतदार यादीतील घोळ समोर आणला. यावेळी त्यांनी लोअर परेलमधील एका वस्तीतील लहानशी खोली दाखवत त्या खोलीतील ३८ जण मतदारयादीमध्ये, त्याच पत्त्यावर दिसत असल्याचं सांगितलं. एबीपी माझाने २८ ऑक्टोबर रोजी त्या ठिकाणी जाऊन, त्या खोलीमध्ये नेमके किती लोक राहतात? किती मतदार त्या खोलीमध्ये राहतात याचा रिऍलिटी चेक केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *