आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत विरोधकांचा सुफडासाफ करा, दुर्बिण लावूनही सापडता कामा नयेत; अमित शाहांची गर्जना
मुंबई:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी असे लढावे की, विरोधकांचा सुपडा साफ झाला पाहिजे. दुर्बिण लावूनही सापडता कामा नयेत, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. मुंबईत महाराष्ट्र भाजपच्या नव्या प्रदेश मुख्यालयाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमातून ते बोलत होते. अमित शाह म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या स्मृतींना अभिवादन करतो. सर्व भाजप कार्यकर्त्यांसाठी आज शुभ दिवस आहे.
महाराष्ट्र भाजप आपल्या नव्या कार्यालयाचे भूमिपूजन करून इतिहासात एक नवीन सुरूवात करतोय. पक्षाची स्थापना झाल्यापासून छोटे मोठ्या कार्यकर्त्यांपासून मोठ्या नेत्यांना माहिती आहे की कार्यालय हे आपले मंदिर आहे. कार्यालयातकार्यकर्त्यांचे प्रशिक्षण होते. बाकीच्या पक्षांसाठी कार्यालय हे फक्त काम करण्याचे ऑफिस असेल. भाजपासाठी कार्यालय म्हणजे मंदिरच आहे.







