आमच्या पक्षात काय करावं हे ठरवणारे संजय राऊत कोण? बावकुळेंचा हल्लाबोल
मुंबईः- भाजपा बूथप्रमुखांचे एक लाख व्हाट्सअप ग्रुप पार्टीच्या वॉररुमसोबत जोडलेले आहेत. याबाबत ते सर्वजण अवगत आहेत. यामाध्यमातून सरकारच्या कल्याणकारी योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आम्ही पोहोचवत असतो. पक्षामध्ये कार्यकर्त्यांसोबतचा संवाद याच व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून होतो, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे. ग्रुपवर त्यावर आलेल्या कमेंट्स वाचून भूमिका ठरवली जाते. नकारात्मक भावना नष्ट करून सकारात्मकता निर्माण केली जाते.
यातून कार्यकर्ते व पार्टी यांच्यातील संवाद अधिक चांगला होतो. त्यामुळे, आमच्या पक्षात आम्ही काय करावे हे ठरविणारे संजय राऊत कोण आहेत? असा प्रश्नही त्यांनी केला. भंडारामध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या दिवाळी मेळाव्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानावरून राऊत यांनी टीका केली होती. त्यावर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.









