आ. भोंडेकर यांचेवर कोणीही खोटे आरोप करतील तर आम्ही शांत बसणार नाही

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- आ. परिणय फुके यांनी दबावतंत्राचा वापर करून जॅकी रावलानी यांचा भाजपमध्ये प्रवेश करवून घेतला. ते भाजपमध्ये गेले याचा आमचा विरोध नाही. परंतु, गेल्या काही दिवसांपासून जॅकी रावलानी हे आ. भोंडेकर यांच्यावर खोटे आरोप करीत आहेत. आमचे नेते, गुरु यांच्या विरोधात कोणी खोटे आरोप लावत असतील तर आम्ही खपवून घेणार नाही, आम्ही पुराव्यानिशी त्यांचा कारभार उघडकीस आणू असा इशारा युवा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख व जॅकी रावलानी यांचे कनिष्ठ बंधू विक्की रावलानी यांनी आज विश्रामगृहात घेतलेल्यापत्रपरिषदेतून दिला. विक्की रावलानी पुढे म्हणाले, रेती सोबत माझा काहीही संबंध नाही. रेती चोर कोण आहे हे भाजपच्याच लोकांनी अनेकदा सांगितले आहे. तरी सुद्धा रेतीची माझे नाव जोडण्यात येत आहे.

विनाकारण कोणी आरोप करीत असेल तर आम्हीही पुराव्यानिशी कोण चोर आहे ते समोर आणू. जॅकी रावलानी हा आ. भोंडेकर यांचा मित्र म्हणून राहिला आहे. पंधरा वर्षे आमदारांनी त्यांना सख्ख्या भावासारखे सांभाळले. त्यांच्यामुळेच तो मोठा झाला. पण आज त्यांच्यावर आरोप करीत आहे. जी महिला राजकारणात राहिली नाही, राजकारणाची आवड नाही, तिला उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात येताच ते भाजपमध्ये गेले, असेही विक्की रावलानी म्हणाले. पक्षाने आतापर्यंतनगराध्यक्ष पदाचे उमेदवाराच्या नावाची घोषणा केली नाही आणि शिवसेनेत अशी प्रथा सुद्धा नाही. डॉ. अश्विनीताई ह्या एमबीबीएस डिजिओ आहेत. आमदारांनी सुरू केलेले भंडाऱ्याचे विकासात अडथळा न यावा या करीता अशा उच्चशिक्षित महिला नगराध्यक्ष पदावर बसाव्यात ही शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची ईच्छा आहे. भंडाराच्या विकासाकरीता त्यांनी निवडणुक लढावी अशी आमची मागणी आहे, असेही विक्की रावलानी म्हणाले. पत्रपरिषदेत माजी नगरसेवक नितीन धकाते, कैलास तांडेकर, मनोज बोरकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *