मुख्यमंत्री सहायता निधीत ५० हजार रुपये केले जमा

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थी पालक व शिक्षक यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या आसमानी संकटात सहयोग निधी रुपये ५० हजार मुख्यमंत्री सहायता निधी जमा केले. सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यावर ओढवलेल्या अस्मानी संकटात मदत म्हणून शाळेने सहयोग निधी उभारावा ही संकल्पना शाळेचे शिक्षक बाळू चव्हाण व मनोहर भैसारे यांनी मांडली. शाळा समिती अध्यक्ष. मदन रामटेके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हुसन बडोले,मुख्याध्यापक धर्मेंद्र कोचे, गटशिक्षणाधिकारी विजय आदमने यांच्या मार्गदर्शनात शाळेतील विद्यार्थी पालक व शिक्षक यांनी विविध गावातून संहयोग निधी रुपये ५० हजार जमा केले. तहसीलदार निलेश कदम, नायब तहसीलदार पेंडाम यांना मुख्यमंत्री सहायता निधीसाठी शाळेतर्फे ५० हजार रुपये चा धनादेश सुपुत्र करण्यात आला

याप्रसंगी मदन रामटेके, हुसन बडोले, विजय आदमने मुख्याध्यापक धर्मेंद्र कोचे शिक्षक बाळू चव्हाण, श्री मनोहर भैसारे, सचिन लूटे, गिरीस सोनवणे, नेकराज वझाडे, प्रयाग्रज बोरकर उपस्थित होते. याप्रसंगी सर्वात जास्त संयोग निधी जमा केले ते बाल विद्यार्थी सुमेधा साखरे,लीसा काशिवार, दुर्गेश डोंगरवार, सोनिया बहकर, श्रेया पवार, आदर्श श्यामकुवर या विद्यार्थ्यांचे अभिनंदन निलेश कदम तहसीलदार यांनी केले.

याबद्दल प्राथ. शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, माध्य. शिक्षणाधिकारी मंगला गोतारने यांनी मुख्याध्यापक व शाळेचे अभिनंदन केले. मदत निधी उभारण्यासाठी शाळेचे शिक्षक मनोज बागडे, आशा चौधरी, नरेश बाळबुदे, धनराज मसराम, तौसिफ सय्यद, मुकेश गुरनुले, पल्लवी शिंदे, लीना हुमणे, कुमुद नाकाडे, अमित डोये, सौरभ मरसकोले, समीर कानेकर, पायल गनवीर, इमरान तुरक ,मनीषा खुणे, पुनम कुंभरे यांनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *