आई-वडिलांनी दिलेले संस्कार मुलामुलींनी जोपासावे -किशोर रहांगडाले
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- आई-वडिलांनी दिलेले संस्कार व संस्कृती मुला – मुलींनी जोपासावे असे प्रतिपादन भाजप किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर रहांगडाले यांनी आपली जन्म भूमी सुकळी येथे आयोजित देवी जागरण कार्यक्रमाच्या उद्घाटकीय कार्यक्रमातून बोलतांनी केले. वैनगंगेच्या कुशीत वसलेल्या सुकळी नकुल येथे माता शारदा उत्सव समितीच्या वतीने देवी जागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दयाल रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या देवी जागरण या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपाचे किशोर रहांगडाले यांनी ज्योत प्रज्वलित करून केले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना किशोर भाऊ म्हणाले मुला – मुलींनी दिशा देणारे व संस्कार घडवून आणणारे पहिले गुरु आई वडील आहेत. आईवडिलांनी दिलेली शिक्षा व संस्कार जोपासावे अन्यथा गंभीर परिणामास सामोरे जावे लागते.
आई-वडिलांना न विचारता चुकीचे निर्णय घेणे व नंतर पश्चाताप करणे ही मोठी शोकांतिका आहे. ही प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे असेही बोलतांनी म्हणाले. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्ष प्रियंका कटरे कार्यक्रमात बोलतांना म्हणाल्या आपण आपल्या कुलदेवतेची आराधना केली पाहिजे इतर इतर धर्माची आराधना करणे चुकीचे आहे. काही धर्मगुरू धर्मांतरणाच्या नावाखाली जनतेच्या भावनेचा छळ करीत आहेत. प्रलोभन देऊन परिवर्तनाच्या अनेक बाबी पुढे आल्या आहेत त्यांच्या अमिषाला बळी पडू नये असे आवाहन सुद्धा प्रियंका कटरे यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सुकळीचे उपसरपंच सोहनलाल पारधी, सिहोरा मंडळ क्षेत्राचे संतोष गौतम, रवींद्र रहांगडाले, रोहित अंबुले, सुनील शिवने, देवराव रहांगडाले, संजय रहांगडाले व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









