जबलपुर – इतवारी “एक्सप्रेस’मध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाश्याकडे सापडले ३ कोटी ३७ लक्ष रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे..

गोंदिया:- रेल्वेतून सोन्याचांदीची तस्करी करण्याचा मोठा डाव दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने उधळून लावला आहे. जबलपुर इतवारी “एक्सप्रेस’ मध्ये एका प्रवाशाकडून तब्बल ३ कोटी ३७ लाख रुपयांहून अधिक किंमतीचे सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून, गोंदिया येथील एका गोल्ड सप्लायरला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक १२८५५ बिलासपूर-इतवारी इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये आमगाव ते गोंदिया दरम्यान तपासणी सुरू होती.कोच नंबर एस- ०६ मध्ये एका व्यक्तीवर संशय आल्याने त्याची बॅग तपासली असता, त्यात सोन्या-चांदीचा मोठा साठा सापडला.गोंदियाचा गोल्ड सप्लायर नरेश पंजवानी (वय ५५ वर्ष,रा.श्रीनगर,गोंदिया) असे या प्रवाशाचे नाव असून, तो गोंदियातील “गोल्ड सप्लायर’ असल्याचे समोर आले आहे. त्याच्या बॅगेत ३.२७ कोटींचे सोने आणि ७.५ किलोहून अधिक चांदी आढळली. साठ्याबद्दल समाधानकारक माहिती न देऊ शकल्याने आरपीएफने हे प्रकरण डीआरडीआयच्या (डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) अधिकाऱ्यांकडे सोपवले. त्यांनी चौकशीनंतर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा ट्रेन गोंदिया स्टेशनवर आली तेव्हा सीबीआयचे निरीक्षक कुलवंत सिंग नागपूर आणि रेल्वे संरक्षण दलाच्या गोंदियाचे निरीक्षक एन.पी.पांडे आले.

आरोपीला गोंदियातील रेल्वे सुरक्षा दलाच्या चौकीवर आणण्यात आले. चौकशी केल्यानंतर त्याने स्वतःची ओळख नरेश टेकचंद पंजवानी (५५), श्रीनगर, गोंदिया येथील रहिवासी अशी करून दिली. नंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याच्याकडे असलेली बॅग तपासली असता, ३ कोटी २७ लाख ३७ हजार ५०० रुपयांचे २ किलो ६८३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १० लाख ४७ हजार रुपयांचे ७ किलो ४४० ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली. ही एकूण रक्कम ३ कोटी ३७ लाख ८४ हजार रुपये इतकी होती. पुढील कारवाईसाठी त्याला दागिन्यांसह महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय), नागपूरच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले. डीआरआय नागपूर प्रादेशिक युनिटने सोमवार १३ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *