ंसर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- सर्वोच्च न्यायालयाचे माननीय सरन्यायाधीश श्री. भूषण गवई साहेब हे केवळ एक व्यक्ती नसून भारतीय संविधानाचे प्रतीक आहेत. ज्या संविधानामुळे या देशात लोकशाही टिकून आहे, त्या संविधानाच्या रक्षणासाठी आणि न्याय मिळिवण्यासाठी देशातील सर्वोच्च व्यासपीठ म्हणजे न्यायालये आहेत. अशा न्यायव्यवस्थेच्या शिखरस्थानी असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या माननीय न्यायमूर्तींवर झालेला भ्याड आणि निंदनीय हल्ला हा देशातील वाढत्या विकृत प्रवृत्तीचा अत्यंत गंभीर संकेत आहे.
ही प्रवृत्ती लोकशाही आणि संविधान या दोघांसाठीही धोक्याची घंटा आहे. या निंदनीय घटनेचा सर्व राजकीय पक्षांनी तसेच देशातील प्रत्येक नागरिकाने तीव्र निषेध करणे आवश्यक आहे. अशा वृत्तीला विरोध करणे आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी जनजागृती करणे ही आजची वेळेची गरज आहे.
दुर्दैवाने, सत्ताधारी पक्ष या घटनेकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे, जे लोकशाहीच्या अधःपतनाचे द्योतक आहे. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करताना माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष चरण वाघमारे, जिल्हा सरचिटणीस विनोद वटी, अजय मेश्राम, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष राकेश श्यामकुवर, सेवादल जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, युवक जिल्हाध्यक्ष नितेश मारवाडे, वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष गितेश ठोंबरे, युवती जिल्हाध्यक्ष नीलिमा रामटेके, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष लतिफ खान, भंडारा शहराध्यक्ष मधुकर चौधरी, भंडारा तालुकाध्यक्ष डुलिचंद देशमुख, महिला शहराध्यक्ष शाहिना खान, युवक शहराध्यक्ष बाला वाडीभस्मे तसेच शहरातील इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निषेध नोंदविला.







