राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शिस्तबद्ध संचालन

दै. लोकजन वृत्तसेवा साकोलीः- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ साकोली नगर द्वारे नुकताच स्थानीय होमगार्ड परेड ग्राउंड वर विजयादशमी व शस्त्रपूजन सोहळा आयोजन करण्यात आला याप्रसंगी पथसंचलन व सभेचे आयोजन करण्यात आले. भारत मातेचे पूजन तसेच शस्त्रपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार तर प्रमुख अतिथी म्हणून साकोली येथील उद्योगपती किसान उद्योग समूहाचे प्रवीण भाई पटेल तसेच तालुका संघचालक राजेशजी कापगते उपस्थित होते.

प्रमुख वक्ते दीपक तामशेट्टीवार यांनी संघाच्या निर्मितीचा उद्देशापासून तर स्वातंत्र्य मिळिवण्यासाठी संघाने केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली. १९२५ साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष आहे. संपूर्ण वर्षभर संघांनी ठरविलेले पंचपरिवर्तन कसे कार्यान्वित करण्यात येईल याबद्दल मार्गदर्शन केले हिंदुत्वाबद्दल व्याख्या करताना सांगितले की संघ हे कोणत्याही जातीपातीचे भेदभाव मानत नसून कुठल्याही जाती धर्माचा पण या राष्ट्राशी समर्पित असलेला कोणताही व्यक्ती हा हिंदू आहे. प्रमुख अतिथी उद्योजक प्रवीण भाई पटेल यांनी संघ गीत ऐकून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे कसे आकर्षित झाले याबद्दल विस्तारपूर्वक सांगितले याप्रसंगी जवळपास १५० स्वयंसेवकांचे घोष आणि दंड सोबत नगराच्या प्रमुख रस्त्यावरून पथसंचलन काढण्यात आले. त्यानंतर होमगार्ड परेड ग्राउंड मध्येच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमांमध्ये मोठा जनसमुदाय उपस्थित होता कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता होमेश गहाणे, गजेंद्र कोसलकर, राजू दुबे, सागर बोरकर, सागर पुस्तोडे, शिवम चंद्रवंशी, रोहित मदनकर हर्षल भस्मे आत्माराम पटले, दीपक दिघोरे यांनी अथक प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *