देह व्यापार अड्डयावर पोलिसांची संयुक्त धाड
दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- स्थानिक गुन्हे शाखा भंडारा पथक आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांनी संयुक्तरित्या केलेल्या महत्त्वपूर्ण कारवाईत, भंडारा शहरातील रमाबाई आंबेडकर वॉर्ड परिसरात सुरू असलेल्या एका देह व्यापार अड्डयाचा पर्दाफाश केला आहे. ही कारवाई दि. १ ऑक्टोंबर रोजी करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे भंडारा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका दुमजली राहत्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाई दरम्यान, संगीता धारगावे (वय ४५) ही मुख्य आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना बोलावून व बाहेरील महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत असल्याचे उघड झाले.
तिच्यासोबत अन्य दोन आरोपीही यात सामील असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी घटनास्थळाहून १ हजार रुपये रोख रक्कम आणि २० हजार २० रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा एकूण २१ हजार २० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलाआहेे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोलिस स्टेशन भंडारा येथे कलम३, ४, ५ (१) स्त्री अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नूरूल हसन, अपर पोलिस अधीक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस हवालदार कुथे, महिला पोलिस हवालदार घरडे, अ. मा. वा. प्र. कक्ष व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी केली.









