विश्व हिंदू परिषदेच्यावतीने १५०० लोकांना त्रिशूल दिक्षा

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- विश्व हिंदू परिषद भंडारा जिल्ह्याच्यावतीने दि. २७ सप्टेंबर रोजी मंगलमूर्ती सभागृह भंडारा येथे राष्ट्र सुरका यज्ञ व धर्म प्रस्त्र त्रिशूल दिक्षा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी १५०० लोकांना त्रिमूल दिक्षा देण्यात आली.

हिंदू युवा, युवती, मातृशक्ति मध्ये देश. देव व घर्मा प्रति आदर, श्रद्धा निर्माण व्हावी, देशाच्या सर्वांगीण विकासा साठी चारित्र संपत्र, नशामुक्त युवा पीढ़ी पुढे यावी या उदात्त हेतु ने पूज्य संत श्री महामंडलेशवर स्वामी नागेंद्र ब्रम्हचारीजी व साध्वी दुर्गा दीदी यांच्या प्रमुख उपस्थितित हा दिव्य सोहळा पार पडला.

कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून मुंबई बजरंग दलाचे संयोजक विवेक कुलकर्णी, प्रमुख अतिथि प्रांत बजरंग बल संयोजक नवीन जैन, कार्यक्रम अध्यक्ष विश्व हिंदू परिषदेचे भंडारा जिल्हाध्यक्ष जॅकी रावलानी तसेच विशेष अतिथि प्रांत दुर्गा वाहिनी संयोजिका सौ भुमि सा. प्रांत स्वावलंबी भारत टोली सदस्य डॉ. सोमदत्त करंजेकर, जिला उपाध्यक्षा सौ कोकिला बाळबुद्धे, सौ कांचन ठाकरे, विभाग संयोजिका श्रीमती दीपा नायर, विभाग मंत्री रमन सिंहल, सौ शुभांगी मेंहे. डॉ. सौ अश्विनी मांडेकर, विभाग बजरंग दल संयोजक सुभाष पटले मंचावर उपस्थित होते.

७ ते १७ वर्ष वयाच्या दुर्गानी कार्यक्रमात तलवार दांडिया व दंड युद्ध चे प्रदर्शन केले. या अविस्मरणीय कार्यक्रमाला भंडारा जिलातील १००० च्या वर, युवा बजरंगी, मातृशक्ति युवती उपस्थित होते. राष्ट्र सुरक्षा यज्ञात सहभागी होवून सर्वानी देश धर्म सुरक्षे ची शपथ घेतली.

कार्यक्रमाचे संचालन जिल्हा मंत्री डॉ राकेश सेलोकर, जिला सह मंत्री प्रकाश पांडे, जिला सह मंत्री नितीन निर्वाण यांनी केले. संपूर्ण व्यवस्था जिला संयोजक बजरंग दल प्रतीक कडू, नगर मंत्री राकेश सेलोकर, सहमंत्री अनिल डोंगरवार, शशिकांत वैद्य, नगर अध्यक्ष कृष्णा हत्तीमार, मनोज मुतकलवार, जिला कोषाध्यक्ष मनोहर हेड़ाऊ, दीपक झवर, जिला मातृशक्ति संयोजिका सौ. अस्मिता सावालपुरकर, सह संयोजिका सौ ममता दलाल. सौ प्रीति जांभूळकर, सौ. सुवर्णा देशकर, देवेंद्र कोहाड़. साहिल भिवगड़े, आशीष दलाल यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *