आज जिल्हाभर स्वच्छतेचा महासंकल्प
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) कार्यक्रमांर्गत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता ही सेवा या मोहिमेदरम्यान उद्या २५ सप्टेंबर २०२५ ला भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक गावात स्वच्छतेची चळवळ रुजविण्यासाठी महाश्रमदान : एक दिवस, एक तास, एक साथ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, गावांमध्ये सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था आणि बाजारपेठा या ठिकाणी एकत्रित स्वच्छता केली जाणार असून या महाश्रमदानात नागरिक, अधिकारी, कर्मचारी यांनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे यांनी केले आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्यावतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत स्वच्छता ही सेवा मोहिम राबविण्यात येत आहे. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) यांचे नेतृत्वा जिल्हाभर स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्याचे नियोजन करण्यात आहे.
गटविकास अधिकारी पंचायत समिती (सर्व) यांचे नेतृत्वा या उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान दर दिवशी विविध उपक्रमाद्वारे स्वच्छता ही सेवेची व्यापकता वाढविली जात आहे. उद्या गुरूवारी स्वच्छतेकरीता महाश्रमदान : एक दिवस, एक तास, एक साथङ्घ हा विशेष उपक्रम जिल्हाभर राबविण्यात येत आहे. स्वच्छतेसाठी फक्त एक दिवस, एक तास द्या; प्रत्येक गाव स्वच्छ करण्याची जबाबदारी आपलीच आहे. त्यामुळे उद्य गुरूवारी सकाळी ८ वाजता सर्वांनी गावोगावी श्रमदानात सामील व्हावे आणि स्वच्छतेच्या जनचळवळीत आपले योगदान द्यावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे यांनी केले आहे.









