जुगार अड्डयावर धाड, ६ जणांवर गुन्हा दाखल

दै. लोकजन वृत्तसेवा अड्याळ ः- अड्याळ पोलिसांनी गोलेवाडी स्मशानभुमी जवळील समाज मंदिरात सुरु असलेल्या जुगार अड्डयावर धाड घालून ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या ताब्यातून १ लाख ६९ हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुकेश रघुनाथ करवाडे (वय ३८), संदीप बंडु डोमळे (वय ३३) दोन्ही रा. पहेला, उज्वल प्रदिप रेहपाडे (वय २३) रा. पहेला, विक्की परमानंद वासनिक (वय ३०) रा. गोलेवाडी, कपील कारुजी रामटेके (वय २९) रा. गोलेवाडी, शुभम हरीदास लोणारे (वय ३३) रा. गोलेवाडी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याआरोपींचे नाव आहे.

अड्याळ पोलीस स्टेशनचे हवालदार डेकाटे यांनी गोपनीय माहितीनुसार धाड टाकली असता आरोपी हे गोलेवाडी स्मशानभुमी जवळील समाजमंदीर मध्ये जुगार खेळतांना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून फळावर मिळालेले पैसे, तासपत्ते, एक बजाज पल्सर मोटार सायकल क्र.एम.एच.३६ वाय. २६५३ व तीन मोबाईल, अंगझडतीतील पैसे असे एकूण १ लाख ६९ हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस स्टेशन अड्याळ येथे गुन्हा नोंद आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सपोनि. पाटील यांच्या मार्गदर्शनात पोहवा. डेकाटे, पोहवा. भुते यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *