आज फार्मसी फोरमने राबवला “नशा मुक्त भारत’ अभियान
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- भंडारा फार्मसी फोरम – सिहोरा, चुल्हाड बपेरा च्या वतीने “फार्मसी सप्ताह’ निमित्त विशेष उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमा अंतर्गत “नशा मुक्त भारत अभियान’ यशस्वी करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. हा कार्यक्रम आज २४ सप्टेंबर रोजी सिहोरा येथील महाराष्ट्र हायस्कूल तथा जुनिअर कॉलेज, जिल्हा परिषद हायस्कूल तथा जुनिअर कॉलेज सिहोरा येथे आयोजित करण्यात आला होता. या अभियानामध्ये, विद्यार्थ्यांना व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगितले गेले आणि त्यांना व्यसनांपासून दूर राहण्याचीशपथ देण्यात आली. फार्मसी फोरमच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांना “नशा मुक्त’ समाजासाठी योगदान देण्यास प्रोत्साहित करण्यात आले.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश “नशा मुक्त भारत’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे हा होता, जेणेकरून देशाची प्रगती आणि युवा पिढीचे भविष्य सुरक्षित राहील. या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून आणि शिक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी तुमसर तालुका औषध विक्रेता संघाचे अध्यक्ष समीर संगडपालिवार, सिहोरा परिसरातील औषध विक्रेता मध्ये विजय कांबळे, आशिष असाटी, शैलेश नागदेवे, शौकत शेख, रितेश शरणागत, वसीम घानीवाला, खालीक शेख, सौरभ ढबाले, आशिष भोयर गुलशन तुरकर आदि उपस्थित होते.









