विदर्भ काशी पवनी महोत्सव 26 पासून, पाच दिवसीय महोत्सवात विविध आयोजन

भंडारा : नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत येत्या 26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यन्त पाच दिवसीय “विदर्भ काशी पवनी महोत्सवा”चे आयोजन करण्यात येत आहे. आम. नरेंद्र भोंडेकर मित्र परिवरा तर्फे आयोजित या महोत्सव दरम्यान विविध सांस्कृतिक व संगीतमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्या करीत संपूर्ण पवनी शहर सुसज्जित करण्यात आले आहे.
पवनी शहर हे मंदिरांचे शहर असल्याने याला विदर्भाची काशी या नावाने ओळख निर्माण झाली आहे. या नावाची प्रचिती संपूर्ण महाराष्ट्रात व्हावी या करीता नावरात्री उत्सवाचे अवचित्य साधत पाच दिवसीय विदर्भ काशी पवनी महोत्सवाचे आयोजन कारण्यात येत आहे. दिनांक 26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या दरम्यान होणाऱ्या या महोत्सयाची सुरुवात 26 सप्टेंबर रोजी मॅरथॉन दौड ने करण्यात येईल. ही दौड सकाळी 7 वाजता कालका माता मंदिर येथून सुरू करण्यात येईल. ज्या करीता विविध वयोगट तयार करण्यात आले आहे. याच दिवशी सायंकाळी 6 वाजता महा आरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. ही महा आरती कोरंभी रोड वर स्थित श्री चंडिका माता मंदिर देवस्थान येथे पार पडेल. दुसऱ्या दिवशी 27 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता रांगोळी स्पर्धा तसेच सायंकाळी 7 वाजता सिने कलाकार व दि ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज शो चे विजेता सुनील पाल यांचा कॉमेडी शो चे आयोजन करण्यात येणार आहे. हा शो पवनी येथील नूतन दुर्गा उत्सव मंडळ चावडी मैदानात आयोजित करण्यात येईल. याच प्रकारे 28 सप्टेंबर रोजी पेस हॉस्पिटल तर्फे संताजी सभागृह बेलघाटा वॉर्ड येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून क्षेत्रातील रुग्णांची तपासणी आणि औषधोपचार करण्यात येईल. सोबतच याच दिवशी सुपर मॉम, सुपर डॅड, एकल नृत्य तसेच सामूहिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्या करीता विविध बक्षीसे सुद्धा ठेवण्यात आली आहे. वरील पाच दिवसीय आयोजनात नागरिकांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून आयोजनाचा लाभ घेण्याचे आवाहन आम. नरेंद्र भोंडेकर मित्र मंडळ, शिवसेना, युवा सेना तसेच महिला आघाडी द्वारे करण्यात आले आहे.
*शहनाज अख्तर व गरबा स्पर्धा ठरणार विशेष आकर्षण*
पवनी महोत्सव अंतर्गत दिनांक 29 सप्टेंबरला सायंकाळी 6.30 वाजता भक्तीगीत संध्याचे आयोजन करण्यात येत आहे. ज्या करीता विशेष आकर्षण म्हणून सुप्रसिद्ध गायिका शहनाज अख्तरला आमंत्रित करण्यात आले असून पवनी येथील भंडारा रोड स्थित नवनिर्मिती दुर्गा उत्सव मंडळ समोर याचे आयोजन करण्यात येणार आहे. या आयोजणाच्या अंतिम दिनी 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता विदर्भ स्तरीय भव्य गरबा व दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. ज्यात विदर्भातील विविध स्थानावरून येणाऱ्या गरबा टीम द्वारे गरबा प्रस्तुत केल्यावर विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.









