शिक्षण व्यवस्था उत्तम करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे -डॉक्टर पंकज भोयर पालकमंत्री

*ग्रामीण विद्यार्थ्यांना नासा (NASA )येथे जाण्याची संधी उपलब्ध करून देणार
*जिल्हा शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभामध्ये पालकमंत्र्यांचे आश्वासन
*शिक्षणामध्ये आमुलाग्र बदल होत आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा बदल होणे गरजेचे आहे.

भंडारा:- विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. सध्या दुर्गम भागातील शाळा सक्षम होण्यासाठी केंद्र सरकारने पीएम श्री शाळा सुरू केलेले आहेत व याच धरतीवर राज्यामध्ये सीएम श्री शाळा सुरू करण्यात आलेले आहेत. यामध्ये प्रायोगिक तत्वावर सध्या काही शाळा घेतले आहेत व त्याचा रिझल्ट उत्तम मिळत आहे. अशाच प्रकारे सर्व शाळा होतील. त्यामुळे शिक्षकांनी आपले लक्ष विद्यार्थ्यांचे गुणवत्ता वाढीकडे व शाळा विकासाकडे द्यावा. आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करताना अभिमान वाटतो. शिक्षण व्यवस्था उत्तम करण्याची जबाबदारी शिक्षकांवरच आहे. शिक्षणा व्यतिरिक्त इतर कोणत्याही समस्या राहणार नाही. दर सोमवारी पालकमंत्री जनता दरबार तालुका स्तरावर भरणार आहे. व तिथेच सर्व समस्यांचे निराकरण होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येणार आहे व या प्रदर्शनी मध्ये प्रथम क्रमांक मिळालेला राज्यस्तरावर सहभाग घेतल्यानंतर प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला नासा अमेरिका येथे जाण्याची संधी शासनाकडून करण्यात येईल असे आश्वासन डॉक्टर पंकज भोयर पालकमंत्री तथा राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभामध्ये केला. ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
जिल्हा परिषद भंडारा शिक्षण विभागा तर्फे जिल्हा शिक्षक पुरस्कार समारंभ व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रम अखिल सभागृह गणेशपुर भंडारा येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राजू कारेमोरे आमदार तुमसर/ मोहाडी विधानसभा क्षेत्र हे होते.त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये जिल्ह्यात शिक्षणाची ख्याती उत्तम आहे. दर्जेदार शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळावे,व्यवहारिक ज्ञानावर भर देण्याचे सुचित केले.उत्तम कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मानच आहे. शासन शिक्षण, आरोग्य व शेतीवर लक्ष देत आहे.सहकार्यातून उत्तम समाज घडतो. विद्यार्थी विकास केंद्रस्थानी ठेवून शिक्षकांनी कार्य करावे असे आव्हान त्यांनी केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सुनील मेंढे माजी खासदार,सावनकुमार जिल्हाधिकारी, मिलिंद साळवे मुख्य कार्यकारी अधिकारी, नरेश ईश्वरकर सभापती, आनंद मलेवार, शितल राऊत सभापती, अनिता नल गोपूलवार सभापती, शितल राऊत सभापती, विनोद बांते गटनेता, कल्पना कुर्जेकर सभापती पंचायत समिती भंडारा, नागेश भगत उपसभापती, प्रमोद पवार उप मुख्य कार्यकारी अधिकारी, संदीप ताले माजी सभापती, रमेश पारधी माजी सभापती,अस्मिता डोंगरे, लता नरुले, यशवंत सोनकुसरे, आशु गोंडाणे होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी प्राथमिक रवींद्र सोनटक्के यांनी केले. त्यांनी शिक्षण विभागाचा आढावा सादर केला. यामध्ये प्रामुख्याने शिक्षणामध्ये होणारी प्रगती व होत असलेले प्रयत्न विशद केले. कार्यक्रमाचे आभार मंगला गोतारणे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी केले.जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना पाहुण्यांचे हस्ते शाल, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.यामध्ये प्राथमिक विभागातून अनमोल रंगारी भिलेवाडा, भंडारा, रामकृष्ण चाचेरे झाडगाव, साकोली, गौरीशंकर वासनिक हसारा, तुमसर, नरेंद्र चौधरी कांद्री मोहाडी, नंदलाल बिलवणे भावड पवनी, माध्यमिक विभागामधून डॉक्टर चोपराम गडपायले, भंडारा, ज्ञानेश्वर मेंढे मुख्याध्यापक सानगडी साकोली, गोपाल राठोड नाकाडोंगरी तुमसर, जिल्हा विशेष शिक्षक म्हणून आभा नंदनवार पदवीधर शिक्षिका जकातदार विद्यालय भंडारा, यांना देण्यात आले. आदर्श शिक्षकांबरोबर उत्कृष्ट काम करणाऱ्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत साधन व्यक्तींना पुरस्कार देण्यात आले. यामध्ये मूलचंद गहाणे,लाखांदूर,कमलेश डोंगरे साकोली, शारदा चौधरी मोहाडी, निवृत्ती नखाते लाखनी, महेंद्र वाहाने पवनी, हेमलता नागदेवे भंडारा, सेवकराम शरणागत तुमसर यांना देण्यात आले. त्याचप्रमाणे इयत्ता दहावी व बारावी मधून मार्च 2025 मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांच्या सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षणाधिकारी विनायक वंजारी,हरिकिशन अंबादे, देवेंद्र शेंडे,रवींद्र माडेमवार, लता धकाते विस्तार अधिकारी, मनीष वाहने कनिष्ठ प्रशासनाधिकारी यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन मुकुंद ठवकर,महेश जगनिक यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *