भंडारा जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा अभियानाला उत्साहात सुरूवात

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- स्वच्छता ही सेवा २०२५ ही मोहिम दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे यांचे मार्गदर्शनात भंडारा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. “स्वच्छोत्सव’ थीम असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ काल बुधवारी (दि. १७ सप्टेंबर) जिल्ह्यात उत्साहात पार पडला. ग्राम पंचायत केसलवाडा पवार (पं. स. लाखनी) येथे जिल्हास्तरीय तर कोथूर्णा, पालडोंगरी, माडगी, केसलवाडा पवार, खैरी वलमाझरी, पुयार व भूयार या ठिकाणी तालुकास्तरीय करण्यात आला. या अभियानात स्वच्छता लक्ष युनिट, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, सुफाईमित्र सुरक्षा शिबिरे, क्लीन ग्रीन उत्सव, प्रबोधनात्मक कार्यक्रम, विशेष ग्रामसभा आणि श्रमदान या घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. स्वच्छोत्सव थीम असलेले स्वच्छता ही सेवा अभियान भंडारा जिल्ह्यात राबविण्यास सुरूवात झाली असून काल बुधवारी (१७ सप्टेंबर) स्वच्छता ही सेवा अभियानाचा जिल्ह्यास्तरीय शुभारंभ पंचायत समिती लाखनी अंतर्गत केसलवाडा पवार येथे उत्साहात पार पडला.

यावेळी नागपूर विभागाचे अपर आयुक्त(आस्थापना) विवेक इलमे, अपर आयुक्त (विकास) कमलकिशोर फुटाणे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) माणिक चव्हाण, गट विकास अधिकारी संदिप पानतावणे, विस्तार अधिकारी अमोल महल्ले, जिल्हा कक्षाचे अजय गजापूरे, पं. स. सभापती अश्विनी मोहतुरे, जि. प. सदस्या सुर्मिला पटले, जि. प. सदस्या विद्या कुंभरे, उपसभापती सुनिल बांते, पं. स. सदस्या प्रणाली सार्वे, पं. स. सदस्या मनिषा हलमारे, तालुका कृषी अधिकारी चौधरी, विस्तार अधिकारी लांजेवार, भांडारकर, सरपंच रोमिला बिसेन, उपसरपंच अनिल नंदेश्वर, ग्राम पंचायत अधिकारी मोनाली लांडगे, ग्रा. पं. सदस्य रामेश्वर बिसेन, प्रशांत मेश्राम ग्रा. पं. पदाधिकारी, बचतगट महिला व नागरिकांची उपस्थिती होते. त्यानंतर स्वच्छता ही सेवा अभियानाच्यास्वच्छोत्सव थिम असलेल्या लोगोचे लोर्कापण करण्यात आले. या प्रसंगी अप्पर आयुक्त विवेक इलमे यांनी, स्वच्छता ही सेवा अभियानामध्ये २ ऑक्टोबर पर्यंत विविध उपक्रम राबवून गावात शाश्वत स्वच्छता निर्माण करावी असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *