भंडारा जिल्हा रुग्णालयात भाजपा युवा मोर्चा तर्फे भव्य रक्तदान शिबिर
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा, भंडारा तर्फे सार्वजनिक जिल्हा रुग्णालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनावेळी जिल्हाध्यक्ष आशु गोंडाने यांनी मार्गदर्शन केले. भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन बोपचे यांनी या उपक्रमाचे महत्त्व पटवून सांगत पंतप्रधान मोदी यांच्या सेवाभावी कार्याचा आदर्श पुढे ठेवला.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीप गजभिये व डॉ. अतुल टेम्भूर्णे यांनी रक्तदानाच्या वैद्यकीय अंगांविषयी माहिती दिली. या शिबिरात जिल्हा महामंत्री मयूर बिसेन, चैतूजी उमाळकर, सचिन कुंभलकर, सूर्यकांत इलमे, विकास मदनकर, आकाश फाले, रुपेश दुरुगकर, प्रदीप साठवणे, अजय ब्राम्हणकर, मिलिंद मदनकर, अक्षय भिवगडे, साहिल चौधरी, विपुल पराते, गुलशन कोरे, प्रशांत पुरुषार्थी, भूषण देशमुख, डिम्मु शेख, फाहीम शेख, चंद्रकला भोपे, साधना त्रिवेदी, माधुरी तुमाने, शोभा घोलपे, रोशनी पडोळे, जया हिंगे, माला बगमारे, मंजीरी पनवेलकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.े







