दोन गांजा तस्कराला पोलीसांनी सापळा रचुन केले अटक
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- भंडारा जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी मोहिमेत तुमसर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि तुमसर पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेल्या कारवाईत दुचाकीसह एक लाख रुपयांचा गांजा जप्त करून दोन आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी पोलीसांना खात्रीशिर माहितीनुसार, तुमसर ते खापा रोडावरील बालाजी बोखेल गोडाऊन, खापा चे समोरील रोडावर पोहोचुन खापा कडुन तुमसर कडे येणाऱ्या वाहनाची तपासनी करीत असतांना सकाळी ०७/५५ वा. सुमारास एका काळ्या रंगाच्या स्कुटीवर १)स्वप्नील विकास घोडीचोर वय २८ वर्ष रा. इंदिरा गांधीवार्ड भंडारा २) प्रशात मोरेश्वर कांबळे वय २६ वर्ष रा गांधी वार्ड भंडारा यांना थांबवून चेक केले असता स्कुटीच्या समोरील लेगरेस्ट मध्ये गुलाबी पिवळ्या रंगाच्या पिशवित हिरंवट काळपट रंगाची पाने, फुले, देठ, कळ्या असलेली वनस्पती गांजा नावाचाअंमली पदार्थ १.८७२ किलोग्रॅम एकुण किमत २८,०८० रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला.
तसेच त्यांचे जवळ असलेली हिरो कंपनीची प्लेझर स्कुटी क्रं. एम.एच. ३६ इ २४३१ कि. अंदाजे ७० हजार रुपये असा एकुण त्यांचे ताब्यातुन ९८ हजार ८० रुपयाचा चा मुद्देमालासह ताब्यात घेवुन ते प्रतिबंधीत गांजा ताव्यतबाळगुन वाहतुक करतांनी मिळून आल्याने त्यांचे विरुध्द एन.डी.पी. एस. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक नुरुल हसन व अप्पर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, सहाय्यक पोलीस अधिक्षक मयंक माधव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स.पो.नि. आकाशकुमार साखरे, पोउपनि प्रविण सयाम,पोहवा, शिवाजी कनोजिया, पो.ना. त्रिभुवन पटले, राकेश पटले, पो.शि. तिलक चौधरी, नामदेव बद्दे, पो.शि. राजकुमार गिरीपुंजे, परिमल मुलकलवार, अजय बावने, नितीन झंझाड, विजय दमाये यांनी केली. पुढील तपास पोउपनि प्रविण सयाम व डी. बी. पथक करीत आहेत.









