तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत पालांदूरचा हिमांशू यशवंत शहारे तालुक्यातून प्रथम
दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर:- जिल्हा परिषद, भंडारा च्या वतीने ४ सप्टेंबर रोजी लाखनी येथील क्रीडा संकुलात आयोजित तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत पालांदूरचा हिमांशू यशवंत शहारे याने १४ वर्षे वयोगटातून ४ प्रतिस्पर्ध्यांना मात देत प्रथम क्रमांक पटकावला आहे व भंडारा येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी लाखनी तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळिवला आहे. हिमांशूच्या या यशाबद्दल गोविंद विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद मदनकर, पर्यवेक्षिका घाटबांधे यांचेसह हिमांशूचे वडील यशवंत शहारे व आई होजीना शहारे यांनी त्याचे कौतुक केले आहे.







