शेत-पाणंद रस्त्यांचा प्रश्न मिटणार; पण राजकीय द्वेष मोठा

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडीः- ग्रामीण भागातील शेत रस्त्यांच्या प्रश्न आजही कायम आहे. शेतकऱ्यांना पायी जाणे अडचणीचे होत आहे. अलीकडे शेती व्यवसायात प्रगती होत असताना रस्त्यांची अडचण होती. शेत-पाणंद रस्त्यांच्या प्रश्न मिटणार आहे. मात्र, गाव विकासात राजकीय द्वेषापोटी अडचणी निर्माण होत आहेत. गाव विकासासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे असे आवाहन पत्र परिषदेत सभापती जगदीश शेंडे यांनी केले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पंचायत समितीच्या मार्फत बरेच विकास कामे होत आहेत. ही कामे ग्रामपंचायत स्तरावर राबवली जात आहेत. पूर्वी शेत-पाणंद रस्त्यांच्या दुर्दशेमुळेशेतकऱ्यांना चिखलातून वाट काढावी लागत होती. पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट होती. त्यामुळे रस्त्यान अभावी शेतकऱ्यांना शेतीमधील पीक बाहेर अवघड होत होते.

पावसाळ्यातील पिके आर्थिक दृष्ट्या फायदेशीर असतानाही रस्त्या अभावी ती पिकविण्याच्या विचार करता येत नव्हता. आता शेत-पाणंद हस्ते होत असल्यामुळे शेत रस्ते उभारणीला प्राधान्य दिले जात आहे. तालुक्यात शेतपाणंद अनेक ठिकाणी चांगली कामे करण्यात आली. ग्रामपंचायतद्वारे अंदाजपत्रकाप्रमाणे कामे व्हावीत. कामात अनियमितता करणाऱ्यांच्या पाठीशी कुणीही राहणार नाही. असे माजी सभापती रितेश वासनिक यांनी सांगितले. पत्र परिषदेला सभापती जगदीश शेंडे, पंचायत समिती सदस्य अशा बोंद्रे, पंचायत समिती सदस्य बाणा सव्वालाखे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश हटवार आदींची उपस्थिती होती. शेत-पाणंद रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी २०६ रस्त्यांना कार्यारंभ आदेश प्राप्त झाला. पावसाळा असल्याने कामे १८५ अर्धवट पडलेली आहेत. अनेक कामांवर मातीकाम व मुरुमकाम झालेला आहे. पावसाळ्यानंतर कामांना सुरुवात होणार आहे. ज्यांच्या शेती जोडून रस्ते जात आहेत त्या शेतकऱ्यांच्या तक्रारीच नाही. मात्र काही गाव पुढारी द्वेषापोटी विरोध करत आहेत. शेती व्यवसाय सक्षम करण्यासाठी पक्के रस्ते व्हावेत यासाठी गावकऱ्यांनी विकासासाठी मदत करावी असे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *