पहिल्या पालकमंत्री जनता दरबारात पवनी तालुक्यातून सर्वाधिक ३१ निवेदने

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या पालकमंत्री जनता दरबार या उपक्रमाला काल, ८ सप्टेंबर रोजी शुभारंभ झाला. नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या पहिल्या जनता दरबाराला जिल्ह्यातून तब्बल १०२ निवेदने प्राप्त झाली. यामध्ये पवनी तालुक्याने आघाडी घेतली असून ३१ निवेदने प्राप्त झाली. त्यापैकी तालुका स्तरावरील २७ अर्ज, उपविभाग स्तरावरील १ अर्ज तरजिल्हा स्तरावरील ३ अर्ज नोंदविण्यात आले.

या पहिल्या जनता दरबारामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या अपेक्षांना सकारात्मक दिशा मिळाली असून, विविध स्तरांवरील अर्ज तत्काळ कार्यवाहीसाठी संबंधित यंत्रणांकडे पाठविण्यात आले आहेत. पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या सूचनांनुसार, या दरबारातून मिळालेली प्रत्येक समस्यानोंदवून जलद गतीने निराकरण करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या दौऱ्यातही त्यांनी अधिनस्त अधिकाऱ्यांना या उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यास स्पष्ट सूचना दिल्या होत्या. यापुढेही दर सोमवारी तहसील स्तरावर जनता दरबार आयोजित केला जाणार असून,नागरिकांनी आपापल्या स्थानिक कार्यालयांमध्ये अर्ज दाखल करून तहसीलदारांमार्फत आपले प्रश्न मांडावेत, असे आवाहन पालकमंत्री कार्यालयाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *