चारचाकी वाहनाचे काच फोडून १ लाख ५० हजाराची चोरी
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली ः- “चारचाकी वाहन इकोस्फोर्ट चे काच फोडून अज्ञात आरोपीने नगदी १ लाख ५० हजार २०० रुपये चोरून नेल्याची घटना दि. ८ सप्टेंबर रोजी रात्री ८.०० वाजता मामा मशर्नरी सेंदुरवाफा समोर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशोल मारोती बोरकर रा. पाथरी हे पंधरा वर्षापासून मामा मशर्नरी सेंदुरवाफा येथे मॅनेजर म्हणून काम करीत आहेत. दररोज अकॉन्टींग व इतर सर्व कामे करून ते रात्री त्यांच्या इकोस्फोर्ट गाडीने पाथरी येथे जात असतात. दि. ८ सप्टेंबर रोजी त्यांचे मालक विनोद लक्ष्मण साखरवाडे यांनी त्यांना अथर्व मोटर्स येथे बोलावून नगदी १ लाख रुपये दिले. त्यानंतर पुन्हा मालकांनी त्यांना ५० हजार रुपये दिले व दुकान बंद करतांना २०० रुपये दिले. असे सर्व १ लाख ५० हजार २०० रुपये त्यांनी त्यांच्याजवळच्या काळ्या रंगाच्या लॅपटॉप बॅग मध्ये ठेवले. ती बॅग त्यांनी त्यांच्या इकोस्पोर्ट गाडी क्र. एमएच ३६ एच ४७०१ चे मागील सिटवर ठेवले.
सर्व दार लॉक करून जवळ असलेल्या मेश्राम हॉस्पीटल जवळील मेडीकल मध्ये पत्नीची औषधे आण्याकरीता पायदळ जात होते. त्याचवेळी त्यांचा मित्र दिंगबर राखडे रा. परसटोला यांनी त्यांना गाडीचा काच फुटलेला असल्याचे सांगितले. ते लगेच परत आले असता त्यांना काच फुटलेला दिसला. व शिटवर ठेवलेली बॅग पाहिले असता ती दिसली. बॅगचा आजु बाजुला शोध घेतला असता गाडीच्या उजव्या बाजुला चिखलात फेकलेली दिसली. बॅग पाहिले असता त्यात पैसे दिसले नाही. अज्ञात चोराने गाडीचा काच फोडून पैसे चोरून नेल्याचे लक्षात येताच त्यांनी साकोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. साकोली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास साकोली पोलीस करीत आहेत.







