बिरसा फार्मर कंपनीने आदिवासी शेतकऱ्यांना कोट्यावधीने गंडविले

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा : -बरसा फार्मर प्रोड्यूसर कंपनी लेंडेझरी द्वारा कार्यालय चिंचोली येथील कंपनीने आदिवासी शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर ट्रॅक्टर वाटपाच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांनी गंडविले असल्याचे वृत्त पुढे आले आहे.त्या कंपनी, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करून ट्रॅक्टर पिडीतांना न्याय मिळावे या अपेक्षेने अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

भंडारा-गोंदिया व नागपूर जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर ट्रॅक्टर देण्याचे आमिष देऊन बिरसा फार्मर प्रोड्यूसर कंपनी लेंडेझरी यांनी १ लाख ३० हजार ते २लाख ३० हजार पर्यंतची रक्कम भरणाऱ्यांना २ महिन्याच्या आत ट्रॅक्टर देण्यात येतील अशी हमी देण्यात आली होती. त्या प्रलोभनाला बळी पडून अनेक शेतकऱ्यांनी तेवढी रक्कम भरली व त्यांच्या कडून पावती सुद्धा घेण्यात आली आहे. सदर कंपनीचे सीईओ मारोती नेताम, अध्यक्ष रोशन सावंतवान, कंपनीचे खंदे समर्थक सहकारी अशोक डायगणे,भाऊराव भलावी रा. खापा,दुर्योधन उके रा. लोहारा, कमला ताराचंद शिंगाडे परसवाडा व राकेश ताराचंद शिंगाडे यांनी खरेदी केलेले ट्रॅक्टर नग ८ अंदाजे किंमत ८० लाख रुपये,बिजापूर चार चाकी शोरूम गाडी किंमत १५ लाख रुपये,गोडाऊन बांधकाम १५ लाख रुपये,घर खरेदी ५० लाख रुपये व बुलेट हंटर टू व्हीलर गाडी १ लाख ५० हजार रुपये अशी मालमत्ता खरेदी केली आहे.

ही मालमत्ता आदिवासी शेतकऱ्यांच्या पैशाने खरेदी करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.सदर इसम हे कंपनीचे खंदे समर्थक आहेत. यांनी कमावलेली बेनामी संपत्ती जप्त करण्यात यावी. दोसीवर कार्यवाही करण्यात यावी.पीडित आदिवासी शेतकऱ्यांचे पैसे परत करण्यात यावे.सदर प्रकरण हा फसवेगिरीचा असल्यामुळे तसेच त्यांचे वर कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या मनात असंतोष खदखदू लागला आहे.जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.सदर प्रकरणाबाबत आ. नरेंद्र भोंडेकर व आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना सुद्धा निवेदन देऊन न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली होती हे येथे उल्लेखनीय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *