जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पत संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा : – सभासदांची आर्थिक अडचण सोडविण्यासाठी संस्था निर्माण झाली असून सभासदांना पाहिजे तेव्हा कर्ज उपलब्ध करून देण्याचा संस्थेच्या माध्यमातून आमचा प्रयत्न असेल परंतु सभासदांनी सुद्धा संस्थेच्या मागणीनुसार वेळेत कर्जाचा भरणा करून संस्थेला सहकार्य केले पाहिजे तरच संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल व सभासदांना पाहिजे तेव्हा कर्ज उपलब्ध करून दिले जाईल असे प्रतिपादन जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित भंडारा गोंदिया या संस्थेचे अध्यक्ष श्री संजीव बावनकर यांनी केले.

लक्ष्मीरमा सांस्कृतिक सभागृह बाजार चौक पवनी येथे जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित भंडारा-गोंदिया या पतसंस्थेची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ३१ ऑगस्ट २०२५ ला पार पडली. याप्रसंगी सभाध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शंकर चव्हाण, शाखाध्यक्ष दिनेश घोडीचोर, चंद्रशेखर दमाहे, सुरेश वैद्य, कैलास हांडगे. संचालक कोमल चव्हाण, पांडुरंग नखाते, अनिल खंडाईत, विजयकुमार डोये, विनोद चौधरी, कन्हैयालाल रहांगडाले, अनमोलमेश्राम, मनीष वाहने, प्रकाश ब्राह्मणकर, केशरीलाल गायधने, रषेशकुमार फटे, सुरेश कोरे, सौ स्नेहल पडोळे, कुमारी शालू सावरकर व संस्थेचे प्रधान व्यवस्थापक विलास फटे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती माता, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व सानेगुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राष्ट्रगीता नंतर सभेला रितसर सुरुवात करण्यापूर्वी आर्थिक वर्ष सन २०२४-२०२५ मध्ये संस्थेचे दिवंगत झालेले मान्यवर सभासद, भारताचे थोर शास्त्रज्ञ, थोर समाजसेवक, थोर साहित्यिक, क्रीडापटू, शिक्षणतज्ञ, शहीद झालेले विर जवान यांना सर्वांनी उभे राहून मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करून मृतात्म्यास शांती मिळावी ही ईश्वरचरणी प्रार्थना करण्यातआली. त्यानंतर माननीय अध्यक्ष श्री संजीव बावनकर यांनी प्रास्ताविकातून आजच्या सभेला उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचे स्वागत केले व संस्थेच्या प्रगतीचा अहवाल सभासदांना वाचुन दाखवला.

यात संस्था इतर बॅंकेच्या कर्जातून मुक्त झाली असुन ठेवीत वाढ झाली. सद्याची नियमित कर्ज मर्यादा २५ लाख आहे. आकस्मिक कर्ज मर्यादा ५०हजाररुपये वरुन ८० हजार रुपये करण्याबाबत प्रस्तावित केले आहे. मृत्युफंड योजनेत सुधारणा करून सभासदांच्या हितावह निर्णय घेण्यात आले आहेत. सर्व शाखांमध्ये बचत खाते, मुदतठेव व अतिरिक्त ठेव योजना सुरू करण्यात आली आहे. ५ लाख रुपये पर्यंत शैक्षणिक कर्ज योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. संस्थेचे भंडारा व गोंदिया जिल्हा असे विभाजन करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखणे. सभासद कर्जावरील व्याजदर भविष्यात पुन्हा कमी करणे. कर्ज वसुली करिता धोरणात्मक योजना आखून एनपीए चे प्रमाण कमी करणे.

डीसीपीएस व एनपीएस धारक सभासदांकरिता एकसूत्री योजना तयार करून सभासदांचा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत करणे याकरिता भविष्यात प्रभावी नियोजन करण्यात येईल. तसेच संस्थेची आर्थिक प्रगती व सभासदांचा हितजोपासण्यासाठी आवश्यक असलेले निर्णय संचालक मंडळाद्वारे घेण्यात येतील अशी माहिती संस्था अध्यक्ष श्री संजीव बावनकर यांनी सभेला दिली.

यावेळी मागील वर्षी पेक्षा नफा जास्त झाल्याबद्दल संचालक मंडळाचे सभासदांकडून अभिनंदन करण्यात आले तसेच भंडारा जिल्ह्यातील पवनी व गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे मागील आमसभेत सभासदांच्या मागणी नुसार संस्थेच्या नवीन शाखा सुरू केल्याबद्दल संचालक मंडळाचा अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. याप्रसंगी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सभासद आमसभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व सभासदांकरिता उत्तम जेवणाची व चहापाण्याची व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली कार्यक्रमाला दोन्ही जिल्ह्यातील सर्व कर्मचारी संवर्गाच्या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन दिनेश घोडीचोर शाखाध्यक्ष यांनी केले तर आभारप्रदर्शन पांडुरंग नखाते संचालक यांनी केले. आमसभेचे यशस्वी आयोजन व संपन्न होण्याकरिता संस्थेचे लेखापाल पराग आदमने, शाखा व्यवस्थापक संतोष बिसने, गुलाब भुरे, संदिपकुमार तिवाडे, रविशंकर रंगारी यांचेसह संस्थेचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. वंदेमातरमब नंतर सभेची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *