राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विदर्भ स्तरीय स्पर्धा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- भारताच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण म्हणजे चंद्रयान३ च्या यशस्वी लँडिंग या स्मरणार्थ २३ ऑगस्ट २०२४ हा दिवस संपूर्ण भारत देशात पहिला राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा केलेला आहे. मागील वर्षी विज्ञान भारती व इस्रो यांच्या संयुक्त विद्यमाने पहिला राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्ताने अंतराळ संशोधन संबंधित स्पेस मॉडेल मेकिंग स्पर्धा व इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी सुद्धा राष्ट्रीय अंतराळ दिन याचे औचित्य साधून विज्ञान भारती तर्फे सुरुवातीला जिल्हास्तरीय व नंतर विदर्भस्तरीय स्पेस मॉडेल तयार करणे व निबंध स्पर्धा दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी रॉयल पब्लिक स्कूल भंडारा येथे आयोजित करण्यात आले. विदर्भातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी विदर्भ स्तरीय स्पर्धे करता सहभाग घेतलेला आहे. सकाळी ११ वाजता श्री मधु सॅम्युअल व प्राचार्य ओमना सॅम्युअल यांचे शुभ हस्ते स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी रॉयल पब्लिक स्कूलचे रोशन, अकॅडमीक व टेक्निकल डायरेक्टर तसेच विज्ञान भारतीचे विदर्भ प्रदेश कार्यकारिणीचे वसुंधरा साठे व राजेश कारेमोरे हे प्रामुख्याने उपस्थित होते. विदर्भस्तरीय या स्पर्धेकरता परीक्षक म्हणून पराग कोरे असिस्टंट जनरल मॅनेजर अशोक लेलँड, डॉ. विजय वऱ्हाटे भौतिकशास्त्र, विभागप्रमुख एस. एन. मोर कॉलेज तुमसर, ज्ञानेश्वर देव्हारे माजी प्राचार्य जि .प. कनिष्ठ महावि. लाखनी, मनोहर उरकुडे माजी प्राध्यापक नानाजी जोशी कनिष्ठ महावि. शहापूर, रमेश उपलप माजी लॉजिस्टिक हेड अशोक लेलँड, मीनाक्षी राव प्रिन्सिपल ग्रेस हायस्कूल गीरोला सर्वांनी परीक्षणाचे काम उत्कृष्टपणे पार पाडले. स्पेस मॉडेल स्पर्धेमधून :- प्रथम क्रमांकाचे पारितोषिक विद्यारंभ हायस्कूल कारंजा जि. वाशिम येथील परी गुप्ता व सौम्यश्री तोमर यांना प्राप्त झाले तर द्वितीय क्रमांक जे. सी. हायस्कूल कारंजा येथील आदिती खडसे आणि तृतीय क्रमांक एस. पी. एम. गर्ल्स हायस्कूल घाटंजी जि. यवतमाळ येथील नंदिनी राठोड व राशी काळे हे मानकरी ठरले.
निबंध स्पर्धेतून प्रथम क्रमांक इरा इंग्लिश मीडियम स्कूल, पांढरकवडा येथील अनन्या चोखानी यांना तर द्वितीय क्रमांक, तथागत पब्लिक स्कूल वरठी जि. भंडारा येथील अपेक्षा भाजीपाले आणि तृतीय क्रमांक स्टार इंटरनॅशनल स्कूल कुडवा जि. गोंदिया येथील इशा गौतम यांना प्राप्त झाला. समारोप व बक्षीस वितरण या कार्यक्रमाकरिता प्रमुख वक्ते म्हणून नुरुल हसन खझड, पोलीस अधीक्षक, भंडारा तसेच विशेष अतिथी म्हणून डॉ. सिंधू गणवीर माजी अधिष्ठाता, शासकीय डेंटल कॉलेज नागपूर, डॉ. पुष्पहास बल्लाळ, माजी सहाय्यक आयुक्त,अन्न व औषध प्रशासन कार्यालय आणि डॉ. मंगेश फडणाईक अधिष्ठाता शासकीय डेंटल कॉलेज नागपूर तसेच विज्ञान भारतीचे विदर्भ प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी वसुंधरा साठे व राजेश कारेमोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय नूरुल हसन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अंतराळ संशोधनाचे फायदे, “विद्यार्थ्यांनी मोठे स्वप्न पहावे व साकार करावे’ हे सांगितले.
तसेच सायन्स व टेक्नॉलॉजी आणि इनोवेशन यामुळे देशाला अनेक अत्याधुनिक गोष्टींची उपलब्धता झालेली आहे याबाबत अनेक वैज्ञानिक उदाहरणे देऊन सर्वांचे लक्ष वेधले. डॉ. फडनाईक यांनी मार्गदर्शन करताना ज्याप्रमाणे एक वर शून्य वाढवत गेला तर किंमत दहा मदहा पटीने वाढते त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले. डॉ. बल्लाळ यांनी विद्यार्थ्यांनी विज्ञानाकडे पूर्णवेळ लक्ष देऊन कॉन्सेप्ट कडे केंद्रित व्हावे असे सुचविले. वसुंधरा साठे यांनी विज्ञानभारतीचे सर्व उपक्रम सांगून विद्यार्थ्यांनी प्राईज मध्ये न अडकता प्रोग्रेस कडे लक्ष द्यावे असे सांगितले. तसेच रॉयल पब्लिक स्कूलचे अकॅडमीक डायरेक्टर रोशन यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारीत असावे, प्रश्न विचारणे थांबवू नये.
यामागे विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास आहे याबाबत उद्बोधित केलं व राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विदर्भस्तरीय स्पर्धेचे आयोजन रॉयल पब्लिक स्कूल भंडारा येथे केल्याबाबत विज्ञान भारती सर्व टीम यांचे आभार मानले. व यापुढे विज्ञान भारतीच्या प्रत्येक उपक्रमात रॉयल पब्लिक स्कूल सपोर्ट करेल व सहभाग होईल याबाबत आश्वासन दिले. या विदर्भस्तरीय स्पर्धेकरता रॉयल पब्लिक स्कूलचे मॅनेजमेंट, प्राचार्य, सर्व शिक्षक/शिक्षिका सर्व कर्मचारी यांनी संपूर्ण सहकार्य व उत्कृष्ट प्लॅनिंग करून स्पर्धा आयोजनास विज्ञान भारती मदत केलेली आहे. विशेष म्हणजे रॉयल पब्लिक स्कूल येथील शिक्षिका सौ. करुणा राहटे, सौ .वैशाली हटवार , ज्योत्स्ना पसीने ,श्वेता कुंभलकर ,सौ .शुभांगी गायधने , सौ. हर्षाली ढबाले यांच्या टीमने विशेष नियोजन केले. याप्रसंगी विज्ञान भारतीचे जिल्हा समन्वयक डॉ. राजेंद्र शहा यांनी राष्ट्रीय अंतराळ दिन व त्यानिमित्त स्पर्धा याचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन विदर्भ प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य सुधीर जोशी यांनी केले. तसेच या विदर्भ स्तरीय स्पर्धेच्या आयोजनासाठी विज्ञान भारती भंडारा चे सहसमन्वयक डॉ. संजय एकापुरे, विदर्भ प्रदेश कार्यकारणी सदस्य संजय आयलवार, प्रदीप ढबाले, विनोद भोंगाडे, पूजा ठाकरे, डॉ. अनिता महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले.







