अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जि. प. समोर तीव्र निदर्शने व धरणे आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन जिल्हा भंडाऱ्याच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय व स्थानिक मागण्यांना घेऊन भंडारा जिल्हा परिषदेसमोर युनियनचे राज्य अध्यक्ष कॉ. दिली उटाणे, जिल्हाध्यक्ष कॉ. सविता लुटे व जिल्हा कार्याध्यक्ष कॉ. हिवराज उके यांच्या नेतृत्वात तीव्र धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय जोल्हे (म व बा.वि.) हे आंदोलनाच्या मंडपात आले. आणि निवेदन स्वीकारल्यानंतर म्हणाले राज्यात स्तरावरच्या मागण्यांच्या पाठपुरावा लगेच करू व स्थानिक मागण्यांचे निवारण त्वरित करू त्यात सेवानिवृत्ती व मृत्यू पावलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमे लाभ तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना जनश्री विमा योजना मधील लाभ, थकीत प्रवास भत्ता मोबाईल रिचार्ज, अंगणवाडी केंद्राला लागणारे रजिस्टर तसेच वेतनश्रेणी आणि तोपर्यंत शासनाने जाहीर केल्याप्रमाणे वाढीव मानधन व किमान वेतन लागू करण्यात यावे इत्यादी मागण्यांच्या समावेश आहे. याप्रसंगी कॉ. दिलीप उटाणे, कॉ. सविता लुटे, कॉ. हिवराज उके, किसना भानारकर यांचे मार्गदर्शन झाले. तर आयटकच्या मंगला रामटेके रिता लोखंडे, गौतमी मंडपे, रेखा टेंभुर्णे, सुनंदा बडवाईक, छाया क्षिरसागर तसेच एचएमएसच्या किसनाबाई भाणारकर कल्पना साठवणे, विना भोगे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *