किशोरदत्त पाखमोडे यांचा सेवानिवृत्ती सोहळा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- गोंदिया शिक्षण संस्था, गोंदिया द्वारा संचालित श्रीमती रेवाबेन मनोहरभाई पटेल महिला कला महाविद्यालय, भंडारा येथील मराठी विषयाचे सहयोगी प्राध्यापक किशोरदत्त पाखमोडे हे ३१ ऑगस्ट २०२५ रोजी ३४ वर्षे अध्यापनाचे कार्य करून सेवानिवृत्त होत आहेत. या निवृत्ती सोहळ्याचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रंजना शृंगारपूरे यांनी भूषविले. व्यासपीठावर सत्कारमूर्ती किशोर दत्त पाखमोडे, डॉ. चंद्रशेखर शर्मा, वनिता पाखमोडे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. किशोर दत्त पाखमोडे अतिशय मृदुभाषी, सहकार्यशील असून संवाद सादने नीट समजावून सांगणारे, कुठलाही अभिनिवेश वा अहंकार नसलेले व्यक्तिमत्त्व आहे, असे विशेष गुण प्राचार्या डॉ. रंजना शृंगारपूरे यांनी आपल्या भाषणात नमूद केले.

या सोहळ्यात डॉ. राहुल भोरे, डॉ. नरेश बोरकर, डॉ. चंद्रशेखर शर्मा प्राध्यापक सुषमा नरांजे, वर्षा मेश्राम, झनेश घरडे यांनी सरांच्या कार्याचा आढावा घेतला व पुढील आयुष्यात निरामय आरोग्य, सुख, शांती व समाधान लाभो, अशा मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. किशोर दत्त पाखमोडे यांनी मनोगत व्यक्त करताना गोंदिया शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय वर्षा बेन पटेल , खासदार प्रफुलभाई पटेल, संस्थेचे सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन यांचे आभार मानले. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रंजना शृंगारपूरे, प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेही आभार मानले. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. श्वेता वेगड यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. कैलास ईश्वरकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *