३ सप्टेंबरपासून आयोजित ओबीसी धरणे आंदोलनात सहभागी व्हा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- ओबीसीमध्ये सहभागी करण्यासाठी मुंबई येथे मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. मराठाच्या आंदोलनाच्या दडपणाला घाबरून राज्य सरकारने मराठ्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करू नये, ओबीसी जनगणना परिषद, ओबीसी जागृती मंच, ओबीसी सेवा संघ, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी क्रांती मोर्चा, युथ फॉर सोशल जस्टीस व जिल्ह्यातील ओबीसी वर्गीय व जातीय संघटना तसेच ओबीसी मित्र यांच्या संयुक्तवतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३ सप्टेंबरपासून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असेआवाहन ओबीसी जनगणना परिषदेचे मुख्य समन्वयक सदानंद इलमे यांनी आज विश्रामगृहात घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेतून करण्यात आले. ते पुढे म्हणाले की, ओबीसींना मराठा आणि ओबीसी असा वाद करावयाचा नाही आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, त्यांना ओबीसींत सामावून घ्या असे दडपण आणणारे आंदोलन सुरु आहे. त्याला सरकारने बळी पडू नये, अशी आमणी मागणी आहे.

मराठा समाजाला ओबीसीमध्ण्ये सामील करू नये. त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे बंद करावे व दिलेले प्रमाणपत्र रद्द करावे. जातनिहाय जणगणना करावी क्रिमीलीयची अट रद्द करावी. प्रत्येक तालुक्यात ओबीसी विद्यार्थ्याकरिता वस्तीगृह सुरु करावे. ओबीसी विद्यार्थ्यांची रखडलेली शिष्यवृत्ती देण्यातयावी. महाज्योतीच्या अनुदानात मागील वर्षी ९० कोटी कमी केले. आणि यावर्षी १३५ कोटी कमी केले ते देण्यात यावे. तामिळनाडू प्रमाणे आरक्षण दिल्यास वाद संपू शकतो पण तिकडे सरकार लक्ष देत नाही. शिवाय केंद्र सरकार हा वाद सोडवू शकते. पण तेही दुर्लक्ष करते. मागील सरकारांनी नाही केलं म्हणून विद्यमान सरकारांकडून अपेक्षा आहे. पत्रपरिषदेत ओबीसी जागृती मंचचे डॉ. बाळकृष्ण सार्वे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मुकेश पुडके, ओबीसी क्रांती मोर्चाचे संजय मते, ओबीसी सेवा संघाचे रोशन उरकुडे, महिला ओबीसी सेवा संघाच्या सौ. ललिता देशमुख, युथ फॉर सेवा जस्टिसचे योगेश शेंडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *