मृत्युशी झुंज देत “त्या’ मेघा बनारसेचा अखेर मृत्यु

दै. लोकजन वृत्तसेवा लाखांदूर :- लाखांदुर तालुक्यातील विरली/बु. येथील रहीवाशी मेघा आकाश बनारसे यांचे छोटे व गरीब कुटुंब पण समाधानी, यांना दोन मुले पहीला अंदाजे दोन वर्षांचा तर दुसरा मुलगा बारा महीण्याचा त्यामुळे त्यांनी शासनाच्या नियोजन कुटुंब पध्दतीला अनुसरुन कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करायचे ठरवुन त्यानुसार लाखांदूर तालुक्यातील सरांडी/बू प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १६ नोव्हेंबर २०२४ रोजी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कॅम्प आयोजित करण्यात आला असता त्यात काही महिला शस्त्रक्रियेकरीत आल्या होत्या. त्यापैकी, विरली/बू येथील मेघा आकाश बनारसे हीची सुद्धा शस्त्रक्रिया करण्यात आली.

परंतु, संबंधित डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे शस्त्रक्रिया अयशस्वी झाली की काय? तरशस्त्रक्रियेच्या दिवसापासूनच रुग्णाला पोटात सलग असह्य वेदना होत असल्याने किंवा कुंटुबाचे म्हणण्यानुसार कुठलीही उपाययोजना होत नसल्याने तिला शासकीय रुग्णवाहीकेने भंडारा येथे पाठविले असता तिला जिल्हा रुग्णालयात उपचाराकरीता भरती न करता कुटुंबीयांनी रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी नाईलाजास्तव कुटुंबीयांनी रुग्णाला भंडारा येथील डॉ.गिèहेपुंजे यांचे श्री साई हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्या रुग्णावर उपचार सुरू झाला आणि १९ नोव्हेंबर २०२४ रोजी परत दुसèयांदा ऑपरेशन करावा लागला. त्यानंतर बरी झाली म्हणुन दवाखाण्यातुन सुट्टी दिल्या गेली. परंतु रुग्ण महीलेला वेदना सुरुच त्यामुळे परत साई हॉस्पीटलला तिला दोन तिनदा नेण्यात आले. पण रुग्णाच्या प्रकृतीमध्ये फायदा न झाल्याचे पाहुन व या दवाखान्याच लाखो रुपयांचा खर्च होत असल्याने सुध्दा कुटुंबातील व्यक्तीच्या जीवासाठी बनारसे कुटुंबीयांनी उसनवारी प्रसंगी कर्ज करून पैश्याची तडजोड केली.

दरम्यान, रुग्णाची स्थिती स्थिर नसतानाही अधिकच्या पैष्या अभावी कुटुंबीयांनी रुग्णाला घरी आणले. दरम्यान, २९ डिसेंबर त्या रुग्णाची परिस्थिती आणखी अत्यंत खालावली. त्यामुळे, तिला पुन्हा ब्रम्हपुरी येथी खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात त्यावेळी मात्र कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी शासनाकडुन आर्थिक मदत मिळण्याकरीता व ऑपरेशन करणाèया डॉक्टरांवर चौकशी करुन कार्यवाही व्हावी या करीता सरांडी/बु. प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आमरण उपोषण करण्यात आले असता त्यात त्या कुटुंबीयांना काय साध्य झाले? हेकळु शकले नाही. परंतु उपोषण मागे घेऊन त्या नंतरही दि. १८ जानेवारी पर्यत ब्रम्हपुरी येथील आस्था या खाजगी रुग्णालयात उपचार सुरुच होता, तर एवढे आय सी यु मध्ये असलेल्या पेशंटचा बिल भरण्याकरीता पैसे आले कुठुन? असा ही प्रश्न तयार या वेळी जनतेच्या मनात येत आहे. आता पैसे या नसल्यामुळे या दवाखान्यातुन डिचार्ज मागुन नागपुरच्या मेडीकल मध्ये दि.१८ जानेवारीला सायंकाळपर्यत भरती करण्यात आले असता अवघ्या काही तासातच जवळपास दोन महीणे वैद्यकिय अधिकाèयांच्या चुकीने व लापरवाहीने ऑपरेशन झालेल्या व मृत्युशी झुंज देत असलेल्या ‘त्याङ्क मेघा बनारसेचा ७ ते ८ वाजेच्या दरम्यान अखेर मृत्यु झाला. दोन छोटी मुल मातृप्रेमाला पोरकी झाली असुन कुटुंबीयासह ग्रामस्थांला मृत्युची बातमी कळताच गावात शोककळा पसरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *