जड वाहतूकासह अतिक्रमण मोकळे करण्यासाठी जनआक्रोश आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- शहरात रोजच्या रोज अपघात घडत असून नुकताच बसस्थानकासमोर कौशल्या दहाट महिलेच्या जीव गेला तर दोन दिवसांनी भरधाव वेगाने आलेल्या रेतीच्या अवैद्य टिप्परने पंचफुला कटरे महिलेच्या हात निकामी झाला त्यामुळे त्या महिलेची प्रकृती चिंताजनक असून त्या रुग्णालयात उपचार घेत आहे. दिवसेंदिवस अश्या अपघाताचे प्रमाण वाढले जात असल्यामुळे तुमसर येथील नगरपालिका मुख्य प्रवेशद्वारा समोर सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. यामध्ये तहसीलदार मोहन टिकले, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड व नगरपालिकेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेलाले यांना अपघाता संदर्भात जाबविचारला गेला. यात शहरातील योग्य उपाययोजना करण्याचे मागण्या करण्यात आले. यामध्ये शहरात जड वाहने वाहतूक यांची स्पीडची मर्यादा कमी करण्यात यावे. शहरातील मुख्य रस्त्यावर बॅरिकेट करण्यात यावे. अवैद्य रेती वाहतूक व अदानी राखेचा वाहतूक करण्याचा निर्धारित वेळ निश्चित करावे. नगरपालिका मुख्याधिकारी तुमसर यांनी गावातील रस्ते अतिक्रमणे मोकळे करावे. शाळेतील विद्याथ्र्यांना मुख्य रस्त्यावरून जाताना वाहतूक पोलिसांनी उपस्थित राहावे. प्रवासी वाहतूक वाहने व बसस्टॉप समोरील वाहनांच्याही स्पीड मर्यादा निश्चित करण्यात यावा. १०, १२ आणि २० चक्के अवजडवाहने शहरात प्रवेश निषेध करावे. बायपास रस्ता मेहंगाव रोड ते खापा रोड रस्ता तात्काळ बनविण्यात यावा.

खापारामटेक रोड वरील हसारा मार्गे कटंगी रोडला वाहतूक सुरू करावे तसेच शहरातील मुख्य मार्गावरील खड्डेमय रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावे या सर्व मागण्या ताबडतोब पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली यावेळी प्रशासनाने वरील सर्व मागण्या मान्य केले असून यावर अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित अधिकाèयांना निर्देश दिले आहे. त्यामुळे जन आक्रोश आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनकत्र्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, अमर रगडे, शिवसेनेचे विभागप्रमुख अमित एच मेश्राम, माजी नगरसेविका सुरज भुरे, मिना गाढवे, वंदना आकरे, करुणा घुर्वे, नेहा मोटघरे, विजया चोपकर, माजी नगरसेवक बाळा ठाकूर, मेहताबसिंग ठाकूर, राजू गायधने, सलाम तुरक, विक्रम लांजेवार, कॉग्रेसचे जितेंद्र बावनकर, प्रमोद कटरे, शैलेश पडोळे, निशिकांत पेठे, राजेश देशमुख, संदीप पेठे, अतुल कारेमोरे, गौरव नवरखेले, हेमंत मलेवार, विक्रम फफुलवधवा, सुनील थोटे, पवन किरपाणे, दीपक लुटे, अमित लांजेवार, आलोक बन्सोड, अजय सहारे, राजेश अग्रवाल, अमर माधवानी, बंडू शर्मा, तिलक गजभिये, तोशल बुरुडे, प्रतिक निखाडे यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *