चंद्रात श्री गुरुनानक देवजींची आकृती दिसल्याचा चिमुकली रुही जगीया ने दिली परिवारास जानकारी
*रात्री १.२० वाजता आई आरती जगीया यांना दिली माहिती
*उपस्थित भाविकांनीही व्यक्त केला दर्शनाचा अनुभव
दै. लोकजन वृत्तसेवा
साकोली :– श्री गुरुनानक देवजींच्या प्रकाशपर्वाचा उत्साह आणि भक्तिमय वातावरण सुरू असतानाच रात्री सुमारे १.२० वाजता एक भावनिक प्रसंग घडल्याचे समोर आले. प्रकाशपर्वा निमित्त केक कापण्याचा कार्यक्रम सुरू असताना चिमुकली रुही जगीया काही कामानिमित्त घराबाहेर आली. यावेळी तिची नजर आकाशात चमकणाऱ्या चंद्राकडे गेली. चंद्रामध्ये तिला श्री गुरुनानक देवजींची आकृती दिसत असल्याचा भास झाला.
रुहीने क्षणाचाही विलंब न करता ही बाब आपली आई आरती जगीया यांना सांगितली. चिमुकलीच्या या बोलण्याने आईसह उपस्थित सर्वांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. त्यानंतर केक कापण्याचा कार्यक्रम पूर्ण झाल्यावर सर्वजण बाहेर आले आणि त्यांनीही चंद्राकडे पाहिले. यावेळी उपस्थित भाविकांनीदेखील चंद्रामध्ये श्री गुरुनानक देवजींच्या आकृतीचे दर्शन झाल्याचा अनुभव व्यक्त केला.
या अनोख्या प्रसंगामुळे प्रकाशपर्वाच्या आनंदात भक्तिभावाची एक वेगळीच अनुभूती निर्माण झाली. उपस्थितांनी हा क्षण आपल्यासाठी भाग्याचा आणि गुरुसाहेबांच्या आशीर्वादाचा असल्याची भावना व्यक्त केली. या प्रसंगाची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली असून, सर्वांचे लक्ष सर्वप्रथम या दृश्याकडे वेधणाऱ्या चिमुकल्या रुही जगीयाचे विशेष कौतुक करण्यात आले.









