अष्टविनायका पैकी एक श्री पंचमुखी गणेश भंडाऱ्याच्या पवनीमध्ये

दै. लोकजन वृत्तसेवा पवनी :- विदर्भातील अष्टविनायका पैकी एक विनायक विदर्भातील काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्हातील पवनी शहरात श्री पंचमुखी गणेश, श्री धुंडिराज गणेश व श्री सवोतोभद्र गणेश या नावाने प्रसिद्ध आहे. पवनी शहर हे विदर्भातील काशी तसेच मंदिराचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. श्री पंचमुखी गणेश शहरातील मध्य भागात विठ्ठल गुजरी वार्डात आहे. इतिहास कारांच्या मतानुसार ही मूर्ती ११ व्या शतकातील असल्याचे सांगण्यात येते. श्री गणेशाची मूर्ती शमी वृक्षापासून बनली असून चारही दिशेला श्री गणेशाचे आकार असून पाचवा भाग दक्षिण पश्चिम दिशेला असल्यामुळे श्री पंचमुखी गणेश म्हणून प्रसिद्ध आहे. श्री गणेशाची उंची ३२ इंच असून पुर्व पश्चिम चौडाई १७ इंच तर उत्तर दक्षिण चौडाई १५ इंच आहे. उत्तर पूर्व व दक्षिण दिशेला श्री गणेशजी चा चेहरा उजव्या बाजुला आहे. हाथा मध्ये लाडु व त्रीशूल स्पष्ट पणे दिसतो डोक्यावर मुकुट. दक्षिण-पश्चिम व पश्चिम दिशेला श्री चा चेहरा सरळ दिशेला आहे.

मूर्ती चतुभर्ुज रुपात आहे. मूर्ती ही १८ इंच जमिनीत आत मध्ये आहे. श्री च्या मूर्ती कडे पाहिले असता मूर्ती ही आकर्षक असून भक्तगण मनमुक्त होउन जातात. मंदिर हे पुरातन असून कवेलू च्या मकानात आहे. बाजूलाच कोरीव असे गरुड खांब आहे. राज्यातील पर्यटन स्थळाच्या यादीमध्ये श्री पंचमुखी गणेशाचे स्थान आहे. मात्र श्री पंचमुखी गणेश मंदिराच्या बाबतीत राज्य शासनाचे लक्ष नसल्याचे दिसते. पंचमुखी गणेश मंदिराची देखभाल विश्वस्त म्हणून श्री अरविंदजी भट्ट करीत आहेत. गणपती उत्सवात मंदिरात श्रद्धालुनची फारच गर्दी असते पंचमुखी गणेश जागृत देवस्थान असल्यामुळे गणेश उत्सवात श्री पंचमुखी गणेश मंदिराला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *