मोकळ्या मैदानात महिलेसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला निष्कासित करा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- वैद्यकीय अधिकारी मोकळ्या मैदानात एका महिलेशी अत्यंत अश्लील व घृणास्पद कृत्य करतानाचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. यामुळे भंडारा जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या अब्रुचे धिंडवडे वेशीवर टांगले जात आहे. या प्रकाराने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मुरमाडी व परिसरातील नागरीकांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला निष्कासित करण्याची मागणी केली आहे. व्हायरल झालेल्या या चित्रफितीमध्ये एक व्यक्ती निर्जन स्थळी मोपेडवरच एका महिलेशी अत्यंत अश्लील व घृणास्पद कृत्य करताना आक्षेपार्हस्थितीमध्ये दिसत आहे. ही व्यक्ती लाखनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मुरमाडी/ तुप. येेथे कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साहिल अंसारी असल्याचे लोकांना कळले. डॉक्टर ही समाजातील एक पवित्र व आदर्श अशी भुमिका मानली जाते. अशा पदावर असलेल्या व्यक्तीकडून अश्लिल वर्तनामुळे परिसरातील महिला, मुले, तरुण, वृद्ध यांच्यामध्ये सदर वैद्यकीय अधिकाऱ्याप्रती असुरक्षितता निर्माण झाली आहे.

यामुळे संबंधित गावात व परीसरात असंतोष पसरला आहे. याप्रकरणी मुरमाडी (तुप) आणि परीसरातील नागरिकांनी भंडारा येथे येवून जिल्हाधिकारी सावनकुमार, जिल्हा परिषदअध्यक्ष कविता उईके, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी मिलींद सोमकुवर यांची भेट घेवून निवेदन दिले. गावातील सामाजिक वातावरण अबाधित राहण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला सेवेतून निष्कासित करण्याची मागणी केली. आता वरिष्ठ अधिकारी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवेदन देतेवेळी नितीन रणदिवे, देवेश नवखरे, रोहित प्रधान, उमेश गायधने, पंकज रामटेके, गणेश हत्तीमारे, उमंग गायधने, मेघनाथ मेश्राम, वियज मुलुंडे, जगदीश देशमुख, नरेश कठाणे, प्रकाश चुटे, गुणवंत बावनकुळे, मनोहर बावनकुळे, कल्याण बावनकुळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *