करडी पोलिसांची जुगार अड्डयावर धाड
करडी (पालोरा) :- मोहाडी तालुक्यातील करडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पालोरा येथील नितीन मेश्राम यांच्या राहते घरी जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळताच करडी पोलिसांनी धाड घालून सहा आरोपी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख २७ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सविस्तर असे की, करडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पालोरा येथे नितीन मेश्राम यांच्या घरी जुगार सुरु असल्याची माहिती करडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी दि.२९ आगस्ट २०२५ रोजी दुपारच्या सुमारास धाड टाकून ६ आरोपीस अटक केली. त्यात नितीन रतनलाल मेश्राम वय ४० वर्ष, अश्विन रतनलाल मेश्राम ३४ वर्ष, रंजित मनिराम वलथरे वय ३७ वर्ष, आकाश हेमराज चचाणे वय २८ वर्ष सर्व रा. पालोरा, शैलेश बालचंद घुगुसकर वय ३० वर्ष रा. जांभोरा व अभिषेक अरूण रामटेके वय २८ वर्ष रा. कळमना (नागपूर) यांचा समावेश आहे. आरोपींकडून नगदी, पाच मोबाईल व दोन टू व्हीलर असा एकूण १ लाख २७ हजार ४०० रु मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. करडी पोलीस स्टेशन ठाणेदार गौरक्षनाथ नागलोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश डोंगरे यांनी ही कारवाई केली.









