देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर ३०२ दाखल होईल का? बीडचे डझ कावतांनी स्पष्टच सांगितलं
धनंजय देशमुख यांची एसआयटी तपासाबाबतची माहिती देत नाही, यासंदर्भातील कुटुंबीयांची मागणी आम्ही एसआयटीच्या प्रमुखांपर्यंत पोहोचवली आहे. डखढ वरिष्ठ अधिकारी उद्या इकडे येत असून त्यांची भेट घेतील. सध्या मस्साजोग मधील परिस्थिती नियंत्रणात आहे. आमची गावकरी आणि देशमुख कुटुंबाला विनंती आहे, अशा पद्धतीने आंदोलन करू नका, आपल्या न्यायासाठी सर्व तपास यंत्रणा प्रयत्न करत आहेत, असे बीडचे एसपी नवनीत कावत यांनी म्हटलं आहे. वाल्मिक कराडवर ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखलकेला जाईल का, असा प्रश्नही एसपी कॉवत यांना विचारला होता. संतोष देशमुख यांच्या पत्नीने सीआयडीकडे जबाब दिला असून जबाबात वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं आहे. त्यांच्याकडून धमकी देण्यात येत होती, असेही त्यांनी म्हटल्याचा संदर्भ देत पत्रकारांनी बीडच्या नवीन एसपींना प्रश्न विचारला होता. मात्र, या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीकडे आहे. त्यामुळे मी याबाबत उत्तर देऊ शकत नाही. मी तपासाबाबत काहीही सांगू शकत नाहीत, उद्या सीआयडीचे प्रमुख येथे येणार आहेत, असे स्पष्ट शब्दात उत्तर नवनीत कावत यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.