मकर संक्रातीच्या गोड मुहुर्तावर हरविलेले ४१ मोबाईल मुळ मालकांना परत गोंदिया शहरातुन
गोंदिया:- गोंदिया शहर पोलीस ठाणे हद्दीतुन मागील ०३ महिन्यात वेगवेगळया ठिकाणाहुन वेगवेगळे कंपनीचे अॅन्डमोबाईल हॅन्डसेट हरविल्याच्या तक्रारी गोंदिया शहर पोलीस ठाणे येथे प्राप्त झालेल्या होत्या. सदर तक्रारीचे गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील ठाणेदार किशोर पर्वते, पोलीस निरीक्षक यांनी गंभीर दखल घेवून त्यांच्या अधिनस्त गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांना मार्गदर्शन करुन हरविलेल्या मोबाईलचे शास्त्रोक्त पध्दतीने शोध घेण्याबाबत आदेशीत केले. त्याअनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार अशोक रहांगडाले, कुणाल बारेवार यांनीहरविलेल्या मोबाईलचे केंद्र शासनाच्या सेंट्रल इक्विपमेंट आइडेंटिटी रजिस्टर या अप्लीकेशन वर हरविलेले मोबाईलचे अर्ज अपलोड करुन पथकाने गोंदिया शहर पोलीस ठाणे हद्दीतुन हरविलेले किंमती २,४६,०००/- रु.चे एकुण ४१ मोबाईल बुध्दीकौशल्याचा वापर करुन अती परिश्रमाने शोधुन काढले.सदरचे मोबाईल मकर संक्रातीच्या गोड मुहुर्तावर दि. १३ जानेवारी २०२५ रोजी श्रीमती रोहीणी बानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया व गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील किशोर पर्वते, पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते त्यांच्या मालकांना परत करण्यात आले.
मोबाईल मालकांना त्यांचे हरविलेले मोबाईल त्यांच्या हाती परत येताच त्यांच्या चेहèयावरील आनंद द्विगुणीत होवून समाधान दिसत होते. पोलीसांच्या या स्तुत्य कामगीरीचे सगळीकडेच कौतुक होत आहे. सदरची उल्लेखनीय कामगीरी गोरख भामरे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, नित्यानंद झा, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, श्रीमती रोहीणी बानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक किशोर पर्वते, डी.बी. पथकाचे पो.हवा. जागेश्वर उईके, कवलपालसिंग भाटीया, सुदेश टेंभरे, सतिश शेंडे, निशिकांत लोंदासे, दिपक रहांगडाले, प्रमोद चव्हाण, पोशि-अशोक राहांगडाले, दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, मुकेश रावते, कुणाल बारेवार, प्रमोद शेंडे, सोनु नागपुरे तसेच सायबर सेल येथील मारवाडे, रहिले, येरणे यांनी केली आहे.