जगतगुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान तर्फे भव्य रक्तदान शिबीर

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- जगतगुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान श्रीक्षेत्र ननिजधाम च्या वतीने ४ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ पर्यंत संपूर्ण सांप्रदायात भव्य रक्तदान महायज्ञ चे आयोजन करण्यात आले असून संस्थान मार्फत १ लाख रक्त बाटल्या समाजातील गरजू रुग्णांच्या सेवीकारिता शासनाला दान करण्याचा संकल्प होता, त्याअनुषंगाने रक्तदान महायज्ञाचे औचीत साधून तालुका सेवा समिती मोहाडीचे वतीने करडी येथील रुखामिनी मातेच्या मंदिरामध्ये १० जानेवारी २०२५ रोज शुक्रवार ला भव्य रक्तदान शिबीर पार पडले उदघाटन प्रसंगी सरपंच नीलिमाताई इलमे, जिल्हा निरीक्षक संतोष भुरे, सामाजिक कार्यकर्ता भूपेंद्र साठवणे, सामाजिक कार्यकर्ता निशिकांत इलमे, शासकीय रुग्णालय चे अधिकारी प्रशांत बडोले, ग्रा. पं. सदस्य धम्मदीप कोटांगले, दीपक बनसोड, सेवा केंद्र अध्यक्ष दिलीप साठवणे, तालुका अध्यक्ष भोजराज वनवे, तालुका महीला अध्यक्ष अंजली बांडेबुचे, तालुका सहकार्यवाह वैश्याली साठवणे, माजी सरपंच धामदेव वनवे व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

शिबिराला प्रसंगी असलेले करडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी प्रशांत मदनकर, डॉ. अजित श्रावणकर, डॉ. श्रीकांत मोहतुरे, औषध निर्माण अधिकारी गणेश भुयार, आरोग्य सेविका शुभांगी ठवकर, आरोग्य सेवक लेनेकर, सरपंच लोकेश रोटके हे होते तर जिला समितीच्या वतीने जिल्हा सचिव होमराजजी वनवे, जिल्हा कैम्प प्रमुख अविनाश बिसने, उपस्थित होते. रक्तदान शिबिरामध्ये १०२ पुरुष२ महिला असे एकूण १०४ रक्तदात्याने रक्तदान केले. १०४ रक्त बाटल्या गरीब, गरजू रुग्णाच्या सेवेकरिता स्यासकीय रक्तपेढी जिल्हा सामान्य रुग्णालंय, भंडारा यांचेकडे सुपूर्द करण्यात आले. रक्तदान यशस्विते करिता रवी कुकडे, ओम साठवणे, मोहन वनवे, धामदेव वनवे, विजय तिजारे, तेजराम खरवडे, वंदना साठवणे, शोभा तिजारे, चंद्रकला कुकडे, प्रगती साठवणे, मंदा राऊत, छाया राऊत, रोकडे ताई, मेघा बावनकर, मोरेश्वर रोडके, आशा खरवडे, बावनकर ताई विशेष सहकार्य तेजस कुकडे, धुरंधर रोकडे, तेजल बांडेबुचे, प्राजली रोडके, qप्रसि रोडके, हर्षा रोडके यांचे सहकार्य केले. कार्यक्रमांचे संचालन सेवा केंद्र प्रमुख दिलीप साठवणे यांनी केले तर आभार धामदेव (बापू) वनवे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *