
दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर :- भारतीय सण आणि निसर्ग यांचे नाते अधिक दृढ करत महिलांनी संक्रांतीनिमित्त होणाèया हळदीकुंकू समारंभात देण्यात येणारे वाण पर्यावरणपूरक बनवले आहे. यंदा संक्रांतीचे वाण देण्यासाठी महिलांकडून पर्यावरणाला हानी न पोहोचवणाèया वस्तूंना पसंती दिली जात असून महिलांच्या मागणीनुसारच बाजारपेठेत वाण म्हणून प्लास्टिकच्या साहित्याला फाटा दिल्याचे दिसून येत आहे. तेल लावण्याचा ब्रश, तेल भरण्याची बाटलीसह इतर साहित्य कापडी पिशव्या वाणाच्या स्वरुपात हळदी-कुंकवासाठी आलेल्या महिलांना दिले जात आहे. नेमक्या याच वस्तूना बाजारपेठमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे दिसून येत आहे. मकरसंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत संक्रांतीच्या हळदीकुंकू समारंभाचे आयोजन महिला करतात. यानिमिताने एकमेकींना वाण देण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे.
आजपर्यंत वाण देण्यासाठी गृहोपयोगी वस्तूंमध्ये स्टील, प्लॅस्टिकच्या वस्तू खरेदी केल्या जात होत्या. मात्र, या वस्तू प्रमाणे मसाल्याचे बॉक्स, घरगुती साहित्यासह विविध प्रकारच्या डिझायनिंग पिशवी, आदींची बुकिंग अनेक महिला बचत गटांच्यातर्फे करण्यात आले असून आगाऊ बुकिंग सुद्धा करण्यात येत असल्याची माहिती आहे. हळदी कुंकवाचेही पॅकिंगचे प्रकार बाजारात आले आहेत. याच्या आवरणाला लहान मणी, लहान आरसे, टिकल्यांची सजावट करून आकर्षक रूपही दिले गेले आहे. १० ते ५० रुपयांपर्यंत याची विक्री केली जात आहे.