
दै. लोकजन वृत्तसेवा मानेगाव बा. :- तिड्डी ते मानेगाव बा व दवडीपार बा. पर्यंत १५ वर्षांपूर्वी पंतप्रधान सडक योजने अंतर्गत संपूर्ण रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले होते. नंतर कुणीच या रस्त्याकडे लक्ष लावत नसल्याने तसेच अधिकाèयांचे दुर्लक्ष पणामुळे लोकांना रस्त्याने ये जा करण्यास अडचण निर्माण झाली आहे. सदर रस्त्याने रात्रीच्या वेळी मुरूम चोरून नेणे हा प्रकार जास्त असल्याने चक्क रस्ता पूर्णपणे खराब झालेला आहे. करिता रस्त्याची कुणीच दखल घेताना दिसत नाही. रस्त्याने दुचाकी वाहन तसेच सायकलने रोजगारांना रोज ये जा करताना खूप अडचण निर्माण झालेली आहे. रस्त्याने मुरूम चोरीचा प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. मुरूम चोरणाèयांची साठगाठ अधिकाèयांसोबत असल्याने धाड मारणारे आधीच त्यांना सांगत असल्याने लगेच मशीन व ट्रॅक्टर घेऊन फरार होत असल्याने अधिकाèयांच्या तावडीत सापडत नसल्याचे चित्र दिसत आहे. परंतु प्रत्यक्षात अधिकाèयांनी डोळे झाक न करता रस्त्याने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यकता बघता त्वरित रस्ता मंजूर करून बांधकाम करण्याची विनंती नागरिकांनी केली आहे.