अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांची कारवाई
दै. लोकजन वृत्तसेवा
साकोली :- पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध रेती उत्खनन व वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाई केली असून, या कारवाईत दोन ट्रॅक्टर व ट्रॉलीसह रेती असा १२ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी राकेश विठ्ठल नाकाडे (३९) रा. शिवनीबांध, गंगाधर शालिग्राम खर्डेकर (३०) रा. सासरा, ओमप्रकाश हरि थेर (३५) रा. न्याहारवाणी यांना अटक करण्यात आल्याची नोंद असून, पुढील तपास सुरू आहे.









