चोरीचा गुन्हा उघड; आरोपीस अटक

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- स्थानिक गुन्हे शाखा भंडारा व लाखनी पोलीसांच्या सतर्कतेने जबरी चोरी करणाऱ्या एका आरोपीला लाखनी येथे पकडण्यात यश आले. पोलीस स्टेशन लाखनी येथे दि. २६ एप्रिल २०२५ रोजी संजय नगर लाखनी येथे घरफोडी झाली होती. संशयीत आरोपींचा फोटो गोपणीय सुत्रांना पाठवुन जिल्ह्यातील गोपणीय यंत्रणा कार्यान्वीत केली होती. आरोपींचा शोध घेत असताना माहिती मिळाली की, समर्थ नगर येथील एक इसम हा आपल्या मित्रांना दारुपिऊन पैसे उडवीत आहे अशी माहीती प्राप्त झाली. समर्थ नगर लाखनी येथे पेट्रोलींग करीत असता एक इसम नामे टिपु देवराम बावनकुळेए वय २२ वर्षे रा. भाटपुरी वार्ड, अड्याळ, ता. पवनी, जि. भंडारा, ह. मु. राजेश मारोती गायधने रा. समर्थ नगर, लाखनी यास ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली. त्याच्या ताब्यातुन चोरीस गेलेला १२ ग्रॅम सोन्याचा गोफ किं.३६,०००/ – रु. व नगदी ६०५०/-रु.असा एकुण ४२,०५०/- रु. चा मद्देमाल जप्त केला.

पोलीस स्टेशन लाखनी अप. क्र. १४४/ २०२५ कलम ३०५ (र), ३३१(३), ३३१(४) भा. न्या. सं. असा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा भंडारा व पोलीस स्टेशन लाखनी पोलीसांच्या सतर्कतेने उघड करण्यात आला. सदरची कारवाई प्रभारी पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा चे पो. नि. नितीन चिंचोळकर, पोलीस स्टेशन लाखनी चे ठाणेदार ह्यदयनारायण यादव, पो. हवा. प्रदीप डाहारे, नितीन महाजन, निलेश रामटेके, पोशि. शुभम ठाकरे, प्रतिक वाघाये, आशीष तिवाडे यांनी केली असुन अधीक तपास पोलीस स्टेशन लाखनी चे अधिकारी करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *