वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती ही ग्रामजयंती म्हणून साजरी करावी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- दि. ३०एप्रिल या दिवशी संपूर्ण राज्यात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. ही जयंती ग्राम जयंती म्हणून साजरी करण्यात यावी अशी मागणी भंडारा तालुक्यातील बोरगाव खुर्द येथील ग्रामपंचायत अधिकारी गोपाल एस. बुरडे यांनी केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद या गावी ३० एप्रिल १९०९ रोजी एका छोट्या कुटुंबात झाला होता. वयाच्या नवव्या वर्षापासून त्यांचं भजन लेखन सुरू झाले. समाजातील जाती पातीच मतभेद विसरून सर्व एकत्र राहण्याचा संदेश आपल्या भजनातून देताना ते म्हणतात की, आयो कोई भी पंती, आयों कोई भी धर्मी, सबके लिय खुला है मंदिर यह हमारा .

सन १९४२चे चले जाव या स्वातंत्र्य लढ्यात पुढाकार घेवून चिमूर या गावी भजनाच्या माध्यमातून युवकांचे मनोबल वाढविण्यासाठी भंजनातून म्हणतात-अब काहे को धूम मचाते हो, दुखवाकर भारत मेरे, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, झाड झडूले शत्र बनेंगे, भक्त बनेगी सेना. एवढेच नाही तर पुढे भारत चीन युद्धात सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी रणांगणात जावून दोन भजने देशावर गायन केले यामुळेच तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रसंत पदवी बहाल केली. देशातील शेतकऱ्या साठी म्हणजेच ग्रामनात करीता ग्रामगीता असा अमूल्य ग्रंथ महाराजांनी लिहला त्यात ग्राम निर्माण कला व ग्रामशुद्धी असे दोन अध्यान ग्रामस्वच्छता अभियान निगडित आहेत त्यामुळेच त्यांच्या नावे शासनाचे स्वच्छ ग्राम स्पर्धा अभियान राबविण्यात येत आहे.

एकदा मोझरी येथील गुरुकुंज आश्रम मध्ये भक्त मंडळी सोबत चर्चा सुरू असताना त्यांना प्रश्न करण्यात आले की आपली जयंती साजरी करण्याचे ठरविले आहे तेव्हा महाराज म्हणतात की माझी जयंती साजरी न करता एप्रिल महिना हा पूर्ण गावा गावात ग्रामउत्सव म्हणून ग्रामजयंती साजरी करण्यात यावे. त्या निमित्ताने गावात सामुहीक स्वच्छता उपक्रम राबवावे, गाव विकासाच्या योजना तयार कराव्यात, गावात विकास कामाचे भुमिपूजन घ्यावेत आणि ग्रामविकासाचे संकल्प हे जयंती निमित्त सर्वांनी करावे, असा संदेश वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी दिला. तसेच स्वतः त्यांनी आपल्याच जिल्यातील आमगाव आदर्श या गावातून आदर्श गावाची सुरुवात केली. त्याच वेळी एकाच दिवशी राज्यातील १ हजार गावे आदर्श केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *