नवरदेवाच्या बग्गीचे ब्रेक वऱ्हाडी नाचण्यात गुंग अनझाले फेल… अनियंत्रित बग्गी वरातीत शिरली

सालेकसा :- गोंदिया जिल्ह्यात सध्या लग्न सराईचे दिवस सुरू आहेत.रविवार जिल्ह्याचा तापमान ४२.२ पर्यंत…अश्या बहुतांश लग्न समारंभ हे रात्रीच्या मुहुर्तावरच संपन्न होतात. अश्याच एका लग्न सोहळ्याच्या नवरदेव सवार असलेल्या बग्गी रथाचे ऐन वेळी ब्रेक निकामी झाल्याने ही बग्गी अनियंत्रित होऊन समोर नाचत असलेल्या आपल्याच वरातींच्या अंगावर धडकल्याने घडलेल्या अपघातात वरातीत सहभागी असलेल्या वर पक्षातील एका महिलेचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमीं झाल्याची घटना सालेकसा तालुक्यातील लोहारा येथे रविवार २० एप्रिल रोजी रात्री ९.०० वाजताच्या सुमारास घडली. गोपीका भाऊलाल ढोमणे (७०) रा. गोंडमोहाडी, ता. तिरोडा, जिल्हा गोंदिया असे मृत महिलेचा व कांताबाई टिकाराम भंडारी (६०) रा. घोटी ता. गोरेगांव जि. गोंदिया असे या घटनेतील जखमी महिलेचे नाव आहे. जखमी महिलेला सालेकसा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सध्या तिच्यावर उपचार सुरू आहे.

सविस्तर वृत्त असे की सालेकसा तालुक्यातील लोहारा येथे मुकेश सहारे यांच्या दोन मुलींचा लग्न रविवार २० एप्रिल रोजी यांच्या निवासस्थानी रात्रीच्या सुमारास आयोजित असल्याने दोन नवरदेव लोहारा या गावी आले होते. त्यात एक गोरेगाव तालुक्यातील झांझिया येथील व दुसरा नवरदेव तिरोडा तालुक्यातील गोंडमोहाडी येथील होता. रविवारी रात्रीच्या सुमारास वरात बँड पथक व डीजेच्या तालात नाचत गाजत नवरीच्या घरी जात असताना अचानक नवरदेवाच्या बग्गी रथाचे ब्रेक निकामी झाल्याने एक नवरदेव सवार असलेली बग्गी अनियंत्रित होऊन समोर नाचत असलेल्या आपल्या वराती च्या अंगावर जाऊन धडकली दरम्यान महिलेचा पाय एका खड्ड्यात पडल्याने आणि त्याच दरम्यान ब्रेक फेल असल्याने यात वरातीत सहभागी असलेली एक महिला च्या अंगावरून बग्गी गेल्याने तिच्या मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

आमंत्रित पाहुण्यांसह लग्न लावण्यास वधु मंडपी पायी जात असता बग्गी ( चारचाकी रथ) वाहन क्रमांक एम.पी. ४८ डी .०३६६ चा चालकाने आपले ताब्यातील चारचाकी वाहन लापरवाहीने, हयगयीने व निष्काळजीपणे चालवुन वरातीतील महिलांना धडक दिल्याने महिलेच्या डोक्यालाजबर मार लागुन तिचे मृत्यूस कारणीभूत , तसेच यातील जखमी हिचे दोन्ही पायाला दुखापत होण्यास कारणीभुत झाल्याचे जखमी फिर्यादी महिलेच्या तोंडी रिपोर्ट व दोन्ही महिलेच्या वैद्यकीय अहवालावरून बग्गी ( चारचाकी रथ) वाहनचालक अंकित कटरे रा.लोहारा यांच्यावर सालेकसा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करुन प्रकरण तपासात घेतला आहे. पुढील तपास सालेकसा ठाण्याचे पोलीस निरीक्षण भूषण बुराडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार सोंजाल तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *