वन्यप्राण्यांनी नासाडी केलेल्या मका पिकाची वन व कृषी विभागाकडून पाहणी

दै. लोकजन वृत्तसेवा करडी/पालोरा :- मोहाडी तालुक्यातील जांभोरा पालोरा परीसरात मोठ्या प्रमाणात मका पिकाची ची लागवड केली आहे. वन्य प्राण्यांचा हैदोस असल्याने मोठ्या प्रमाणात नासाडी केली जात असल्याने शेतकऱ्यांकडूनमका पिकाची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती आणि त्या संदर्भात वनविभागाला सुध्दा तक्रार केली होती. शेतकऱ्यांच्या तक्रारी नुसार आज जांंभोरा परीसरात वनविभाग व कृषी विभागाकडून मका पिकाची पाहणी करून पंचनामा करण्यात आले. वनविभाग व कृषी विभागाला पंचनामा अहवाल सादर करून शेतकऱ्यांच्या झालेल्या मका पिकाची नुकसान भरपाई शासनामार्फत दिले जाणार असल्याचे सांगितले आहे. पंचनामा करण्यासाठी वनविभागाचे बिटरक्षक शिवाजी जुंबाड, कृषी सहायक के. पी. देवळे, तलाठी कटरे, यांनी मौका पाहणी केली. यावेळी उपसरपंच यादोराव मुंगमोडे, अजय गजभिये, जयदेव काळे व शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *