
दै. लोकजन वृत्तसेवा वरठी :- जिल्हा परिषद हायस्कूल व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वरठी येथे वर्ग १० वीचा निकाल ८८.३७ टक्के लागला. शाळेनी यशाची परंपरा कायम राखली. प्राविण्य श्रेणी ८, प्रथम श्रेणी २५, द्वितीय श्रेणी ३०, तृतीय श्रेणी १३ एकूण ७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेतून प्रथम रूचिका मरघडे ८५.८०, द्वितीय कु. श्रुती बडवाईक ८५.२०, किर्ती कुंभरे ८४ टक्के गुण मिळवले.गुणवंत विद्यार्थ्यांचे एकनाथभाऊ फेंडर, उपाध्यक्ष जि. प. भंडारा तथा अध्यक्ष शाळा समिती, प्रियंका मते व्यवस्थापन समिती अध्यक्ष, कु. केशर बोकडे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी वर्गशिक्षक विजय हटवार व वर्षा मेश्राम, गोपाल लांजेवार, सुनील शेंडे, सुरेखा धुर्वै, विकास भुरे व मानसी लोणारे उपस्थित होते.