मुख्याध्यापिका मंगला बोपचे शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती व नवोपक्रम स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल

या दोन्ही स्पर्धेचे पुरस्कार वितरण उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, प्राथमिक शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के, जि. शि. व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या रत्नप्रभा भालेराव, उपशिक्षणाधिकारी मंगला गोतमारे, अधिव्याख्याता कल्पना बनकर यांच्या हस्ते पार पडले. मंगला बोपचे ह्या उपक्रमशील, तंत्रस्नेही, जिल्हा पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका असून जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर विविध प्रशिक्षणात मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या ह्या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी सुभाष बावनकुळे, शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर झोडे, प्रमोद हटेवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वैशाली शेंडे, उपाध्यक्ष आकाश शेंडे, सदस्य निशा शेंडे, चेतना बावनकर, स. शिक्षक अरुणा फुंडे, संतोष शेंडे, सरिता कालेजवार इत्यादी शिक्षकांनी तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.