समर्थ विद्यालय लाखनीचा निकाल ९६ टक्के

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- समर्थ विद्यालय, लाखनी येथील इयत्ता दहावीचा शालांत परीक्षा २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यंदा विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एकूण १७५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, त्यापैकी १६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामुळे विद्यालयाचा एकूण निकाल ९६.००% इतका उच्च टक्केवारीने लागला आहे. श्रेणीनुसार यशस्वी विद्यार्थ्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे. प्राविण्य श्रेणी: ४२ विद्यार्थी, प्रथम श्रेणी: ६७ विद्यार्थी, द्वितीय श्रेणी: ४८ विद्यार्थी, तृतीय श्रेणी: ११ विद्यार्थी आलेत.

प्रथम क्रमांक: गुंजन किरण क्षीरसागर ४७४ गुण (९४.८०%), द्वितीय क्रमांक: श्रेयश संतोष वाघाये ४६८ गुण (९३.६०%) व तृतीय क्रमांक: निश्चय प्रभुदास तिरपुडे ४६१ गुण (९२.२०%) यांनी पटकाविले.या यशामागे संस्थेचे अध्यक्ष आल्हाद लाखनीकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल बडवाईक तसेच अभय भदाडे, अनिल पुडके, प्रदीप लिचडे, अनिल बावनकुळे आणि गायत्री भुसारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व परिश्रम लाभले. शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थ्यांनी एकदिलाने घेतलेल्या मेहनतीचे हे फलित आहे. संस्थेच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *