लाखनीची खरेदी विक्री शेतकी सहकारी संस्था काँग्रेसच्या ताब्यात

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- स्थानिक साकोली सहकारी शेतके खरेदी विक्री समितीच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणीत परिवर्तन शेतकरी पॅनलचे ११ उमेदवार विजयी झाले. भाजपा राकॉ प्रणित सहकार शेतकरी पॅनलचे ३ उमेदवार विजयी झाले त्यातील तिन्ही विजयी उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. सदर निवडणुकीच्या निकालानंतर गेल्या ३० वर्षापासून भाजपाच्या ताब्यात असलेले खरेदी विक्री सहकारी संस्था काँग्रेसच्या ताब्यात आली आहे.

आ. नाना पटोले यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली गेली. पटोले यांनी स्वतः लक्ष देऊन खरेदी विक्री संस्था काँग्रेसच्या ताब्यात आणली. वैयक्तिक सभासद गटातून जगन्नाथ कापसे, मार्कंड भेंडारकर, दत्ता गिऱ्हेपुंजे, जयकृष्ण फेंडरकर, खेमराज समरीत, नरेंद्र झलके, महिला राखीव गटातून अश्विनी भिवगडे, अनिता बोरकर, अनुसूचित जाती गटातून सचिन बागडे, भटक्या विमुक्त जाती गटातून नामदेव राऊत, इतर मागासवर्गीय गटातून महादेव गायधनी, संस्था प्रतिनिधी गटातून विजय कापसे विजयी झाले आहेत. भाजपा राकॉ चे सतीश समरीत, वसंत शेळके, शैलेश गजभिये हे संस्था प्रतिनिधी गटातून विजयी झाले. विजयी उमेदवारांची लाखनी शहरातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *