
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- जनगणना परिषद जिल्हा भंडारा यांनी जातनिहाय जनगणना करण्यासाठी अनेक निवेदन दिले, मोर्चे काढले, तीन वेळा विराट मोर्चा काढण्यात आले,धरणे आंदोलन करण्यात आले व खासदाराच्या घरासमोर ठिय्या आंदोलन व धरणे देण्यात आले. याची दखल केंद्र सरकारने घेतल्यामुळे जातनिहाय जनगणना करण्यात येईल असा निर्णय केंद्र सरकारने घेतलेल्या मुळे निर्णयाचे अभिनंदन करण्यात आले. या निर्णयाची अंमलबजावणी केंद्रसरकारने करावी याबाबतचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी कार्यालया भंडारा मार्फत पंतप्रधान नवी दिल्ली, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पाठविण्यात आले. निवेदन देताना जनगणना परिषदेचे सदानंद इलमे, भगीरथ धोटे, बाळकृष्ण सार्वे, के झेड शेंडे, वामनराव गोंधुळे, पांडुरंग फुंडे, संजय आजवले, मोरेश्वर तिजारे, अज्ञान राघोर्ते,रामलाल बोंद्रे, गुणवंत पंचबुधे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.